धुळे : धुळे तालुक्यातील अनकवाडी येथील सरपंच पदाचा वाद आणि राजकिय वैमनस्यातून दोन गटात वाद निर्माण झाला होता. या वादतून त्यावेळचे सरपंच पितांबर दौलत चव्हाण (वय ५५) व त्यांचा मुलगा पुथ्वीराज पितांबर चव्हाण (वय १८) या दोघांवर जिवघेणा हल्ला झाला होता.
यात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात १४ जण आरोपी होते. या १४ ही आरोपीना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे धुळे न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला असून तब्बल सात वर्षांनंतर मृतांच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे.
सदर खून खटल्याच्या कामकाजा दरम्यान धुळे न्यायालयाने सरकारी वकिलाची साक्ष ग्राह्य धरत या खटल्यातील १४ आरोपींना एकसोबत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. महाराष्ट्रात एकाच वेळेस गुन्हयातील सर्व १४ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यांचा हा दुर्मिळ व ऐतिहासीक निकाल मानला जात आहे. यामुळे कुटुंबाला न्याय मिळाला आहे.















Discussion about this post