मुंबई /जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यामध्ये एकीकडे गुलाबी थंडीची चाहूल लागली असतानाच दुसरीकडे राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होत आहे.
हवामान खात्याने राज्याच्या काही भागात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण तामिळनाडूमध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. गोव्यासह तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही सध्या जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. राज्यात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी आकाश निरभ्र तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील.
जळगाव जिल्ह्यातही पावसाचा इशारा
हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्यात १० ते १३ नोव्हेंबरदरम्यान, पावसाची शक्यता वर्तविली आहे. दुसरीकडे थंडीचा पारा १५ वरून १८ ते २० अंशावर पोहोचणार आहे.















Discussion about this post