जामनेर । महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसागणित वाढत चालले आहे. अशातच जामनेर तालुक्यात हादरवून सोडणारी एक घटना समोर आलीय. २९ वर्षीय विवाहितेवर एकाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाविरोधात जामनेर पोलिसात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय विवाहित भाड्याच्या घरात असून, दि. ३० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास २५ वर्षीय विवाहितांच्या घरी येउन तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले जर हि घटना कुणाला सांगितलीस तर तुझ्या दोन्ही मुलींना जीवे मारून टाकेल अशी धमकी देखील यावेळी संशयित आरोपीने विवाहित मिळेल माहिती दिली.
त्यानंतर विवाहित महिलेने जामनेर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागर काळे हे करीत आहे.















Discussion about this post