भुसावळ । दोन दुचाकींची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना भुसावळ तालुक्यातील फुलगाव फाट्याजवळ घडली. विजय रामकृष्ण महाजन ( वय ४७, रा. फुलगाव ) आणि ललित दांडे (वय ३५ रा. वरणगाव ) असे मृत दोघांचे नाव आहे. याबाबत
याबाबत असे की, फुलगाव फाट्याजवळ दोन मोटारसायकल स्वारांनी एकमेकांना धडक दिली. यात दोन्ही जण गंभीर जखमी झाले. या जखमींना वरणगावच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टर्सनी मृत घोषीत केले.
या भीषण अपघातात विजय महाजन आणि ललित दांडे या दोघांना आपले प्राण गमवावे लागले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होतांनाच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. फुलगाव फाट्यावर अनेक लहान-मोठे अपघात होत असल्याने येथे सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी कधीपासून होत असली तरी याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
दरम्यान, दोन्ही मृतांच्या पार्थिवाचे आज सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती वरणगाव पोलीस स्थानकाच्या सूत्रांनी दिली आहे.















Discussion about this post