जळगाव । तालुक्यातील वावडदा येथून जळगावात परतत असताना रामदेववाडी जवळ तरुणाच्या दुचाकीला अपघात झाला असून यात एकाचा उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. निलेश गोकुळ पाटील (वय २५, रा. राम मंदिर, मेहरूण, जळगाव) असं मृत तरुणाचे नाव असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. महेश रविंद्र खोरपडे (वय ३०, पाणीपुरवठा कार्यालय परिसर, मेहरूण, जळगाव) असं जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.
हे दोघे तरुण वावडदा येथून येथून गुरुवारी २८ रोजी संध्याकाळी ६. ३० वाजेला जळगावात परतत होते. रामदेववाडीजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यावेळी नागरिकांनी व नातेवाईकांनी निलेशला खाजगी रुग्णालयात तर महेश खोरपडे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना शुक्रवारी २९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास निलेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तर महेश खोरपडे याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निलेश पाटील याचे पश्चात वडील, १ भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. दरम्यान, म्हसावद दूरक्षेत्रात नोंद होऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.















Discussion about this post