नवी दिल्ली । दिल्लीतील नामवंत ज्वेलर्सच्या शोरूममधून कोट्यवधींची चोरी झाल्याची घटना घडली होती. या चोरीप्रकरणी मुख्य आरोपीसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याला छत्तीसगडमधून अटक करण्यात आली. लोकेश श्रीवास्तव आणि शिवा अशी अटक आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्यांच्याकडून लुटीचा बराचसा मालही जप्त केला.
खरंतर , दिल्लीतील जंगपुरा भागात रविवारी रात्री एका नामवंत ज्वेलर्सच्या शोरूममधून 25 कोटी रुपयांची चोरी झाली. उमराव सिंग आणि महावीर प्रसाद जैन यांचे हे शोरूम आहे. चोरट्यांनी दुकानातील सुमारे 20 ते 25 कोटी रुपयांचे हिरे, सोनं आणि चांदीचे दागिने लंपास केले होते. शोरूमचे छत कापून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला होता.
छत्तीसगड पोलिसांनी दुर्ग येथून 7 चोऱ्या करणाऱ्या लोकेश श्रीवास या आरोपीला स्मृतीनगर पोलीस ठाणे हद्दीतून अटक केली. त्यानेच दिल्लीतही मोठी लूट केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून दिल्लीच्या शोरूममधून लुटलेलं तब्बल 18 किलो सोन आणि 12.50 लाख रुपयांची कॅश जप्त केली आहे. तर लोकेशचा दुसरा सहकारी शिवा चंद्रवंशी याला कावर्धा येथून दागिन्यांसह २८ लाख रुपयांच्या मालासह पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपींना अटक करून दिल्लीत आणण्यात येणार आहे.















Discussion about this post