मुंबई : मागील गेल्या अनेक महिन्यापासून शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा तिढा सुटता सुटत नाहीय. या प्रकरणाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. अशातच या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आमदार अपात्रतेचा मुद्दा सोडून विधानसभा अध्यक्ष इतर विषयात वेळ घालवत आहेत, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
इतकंच नाही, तर विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर देखील ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याबाबतचं प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे.
येत्या ०६ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात आमदार अपात्र प्रकरणावरील याचिकेवर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत हा मुद्दा मांडला जाणार आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याकडेचं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.















Discussion about this post