Wednesday, November 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

संजय शिरसाटांवर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; २५ कोटींच्या ट्रेनिंग सेंटरसाठी मागितले ५ कोटी?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 25, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
संजय शिरसाटांवर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; २५ कोटींच्या ट्रेनिंग सेंटरसाठी मागितले ५ कोटी?
बातमी शेअर करा..!

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी लातूरमधील एका सामाजिक कार्यकर्त्याकडे अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या ट्रेनिंग सेंटरचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आल्यानंतरही मंत्र्यांनी पैसे घेतल्याशिवाय काम करणार नसल्याचा हट्ट धरल्याचा दावा राऊत यांनी केला. यावरून त्यांनी संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

खासदार संजय राऊत सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून, बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा गंभीर आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. राज्यातील प्रशासन आणि मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचे कोणतेही नियंत्रण राहिलेले दिसत नाही. महाराष्ट्र भ्रष्टाचारात अव्वल ठरत असून, एका बाजूला दुष्काळाची झळ आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराची होरपळ नागरिकांना सहन करावी लागत आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

२५ कोटींच्या प्रकल्पासाठी ५ कोटींची मागणी?
या आरोपाची पार्श्वभूमी सांगताना राऊत म्हणाले की, लातूरमधील मातंग समाजाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते नरसिंग उदगीरकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. सुमारे २५ कोटी रुपये खर्चाच्या या केंद्रातून दलित आणि मातंग समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण तसेच विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता.

या प्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही उदगीरकर यांना वारंवार मंत्रालयाचे हेलपाटे मारावे लागत होते. मंत्र्यांना भेटल्याशिवाय काम होणार नसल्याचे ओएसडी सिद्धार्थ भंडारी यांनी त्यांना सांगितल्याचा दावाही राऊत यांनी केला. नरसिंग उदगीरकर यांना मंत्र्यांनी भेटीसाठी बोलावले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी २५ कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्याच्या बदल्यात ५ कोटी रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप राऊत यांनी केला. त्यावर उदगीरकर यांनी आपण दलित समाजासाठी काम करत असून एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. मात्र, पैसे दिल्याशिवाय प्रस्ताव मंजूर होणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला.

या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आली होती. मात्र, विभागाकडून या संदर्भातील माहिती मंत्र्यांपर्यंत पोहोचल्याचा आणि त्यानंतरही त्यांनी पैसे घेतल्याशिवाय काम करणार नसल्याचा पवित्रा घेतल्याचा खळबळजनक दावा राऊत यांनी केला.या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्याचे आवाहन करत संजय राऊत यांनी नरसिंग उदगीरकर यांना समोर आणून त्यांची बाजू ऐकण्याची मागणी केली. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने उभारल्या जाणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या प्रस्तावावर अशा प्रकारे पैशांची मागणी होत असेल, तर हे गंभीर असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेऊन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मात्र, या आरोपांवर संजय शिरसाट यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

गाडी अडवली अन् संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकले; जळगावच्या तिघांचा मृत्यू

Next Post

जळगावच्या भूषण ठाकरेने KBC मध्ये रचला इतिहास; १ कोटी जिंकत ठरला १८ व्या पर्वाचे पहिला करोडपती!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावच्या भूषण ठाकरेने KBC मध्ये रचला इतिहास; १ कोटी जिंकत ठरला १८ व्या पर्वाचे पहिला करोडपती!

जळगावच्या भूषण ठाकरेने KBC मध्ये रचला इतिहास; १ कोटी जिंकत ठरला १८ व्या पर्वाचे पहिला करोडपती!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावच्या भूषण ठाकरेने KBC मध्ये रचला इतिहास; १ कोटी जिंकत ठरला १८ व्या पर्वाचे पहिला करोडपती!

जळगावच्या भूषण ठाकरेने KBC मध्ये रचला इतिहास; १ कोटी जिंकत ठरला १८ व्या पर्वाचे पहिला करोडपती!

November 25, 2026
संजय शिरसाटांवर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; २५ कोटींच्या ट्रेनिंग सेंटरसाठी मागितले ५ कोटी?

संजय शिरसाटांवर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; २५ कोटींच्या ट्रेनिंग सेंटरसाठी मागितले ५ कोटी?

November 25, 2026
गाडी अडवली अन् संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकले; जळगावच्या तिघांचा मृत्यू

गाडी अडवली अन् संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकले; जळगावच्या तिघांचा मृत्यू

November 25, 2026
जळगावसह राज्यात तापमानाचा पारा वाढला ; आज कसं राहणार तापमान?

जळगावात हवामानाचा यू-टर्न! दोन दिवसांत तापमानात मोठी वाढ; पुढील चार दिवस असे राहणार हवामान

November 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page