Saturday, November 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मंत्री नरहरी झिरवळांच्या तत्कालीन सचिवांवर निलंबनाची कारवाई ; नेमकं प्रकरण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 21, 2026
in महाराष्ट्र
0
तर मी राजीनामा देईल ; कारकुनाला अटक झाल्यानंतर नरहरी झिरवळांनी एका वाक्यात विषय संपविला
बातमी शेअर करा..!

मुंबई ।महाराष्ट्र सरकारने अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचे माजी खाजगी सचिव रामदास गाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मंत्रालयातील लाचखोरीच्या स्टिंग ऑपरेशननंतर त्यांना खाजगी सचिव पदावरून हटवून मूळ विभागात पाठवण्यात आले होते. त्यानंतर शिस्तभंग आणि गैरवर्तणुकीच्या आरोपांप्रकरणी आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने गुरुवारी निलंबनाचा आदेश जारी केला. आदेश जारी झाला, त्यावेळी डॉ. गाडे हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९७९ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्यपालांनी रामदास गाडे यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मंत्रालयातील कथित लाचखोरीच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. हे प्रकरण फेब्रुवारी २०२४ मध्ये मंत्रालयातील मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात समोर आलेल्या कथित लाचखोरीच्या स्टिंग ऑपरेशनशी संबंधित आहे. या प्रकरणानंतर डॉ. गाडे यांना प्रतिनियुक्तीवरून कार्यमुक्त करून त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मावळ तालुक्यात सहाय्यक आयुक्त म्हणून पदभार सांभाळला.

नेमकं प्रकरण काय?
निर्मल शर्मा या मेडिकल स्टोअर मालकाने केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले होते. औषधांसाठी असलेल्या रेफ्रिजरेटरमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि ओआरएसची पाकिटे ठेवण्यात आल्याचे आढळल्याने त्यांच्या दुकानाचा परवाना एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आला होता.

या निर्णयाविरोधात शर्मांनी ७ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात अपील दाखल केले होते. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी ते मंत्रालयात पोहोचले. शर्मांच्या आरोपानुसार, सुनावणीदरम्यान त्यांना रामदास गाडे यांच्या केबिनमध्ये बसवण्यात आले.

यावेळी राजेंद्र धेरांगे नावाच्या एका कारकुनाने कथितरित्या १ लाख १० हजार रुपयांची लाच मागितली, असा आरोप आहे. यातील १ लाख रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी, तर १० हजार रुपये स्वतःसाठी असल्याचे सांगण्यात आल्याचा शर्मांचा दावा आहे. त्यानंतर ही रक्कम निम्मी करण्याचीही चर्चा झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते.शर्मांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी २ हजार रुपये ऑनलाइन आणि ५३ हजार रुपये रोख स्वरूपात दिले. या संपूर्ण प्रकरणानंतर मंत्रालयातील लाचखोरीचा मुद्दा चर्चेत आला होता. आता या प्रकरणात रामदास गाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खान्देशात थंडीचा हुडहुडी भरणारा तडाखा; धुळे राज्यात आघाडीवर, जळगावचाही पारा ८ अंशांवर

Next Post

१९७२ च्या दुष्काळापेक्षाही यंदाची स्थिती गंभीर! राज्यात रब्बीच्या पेरण्या इतिहासात नीचांकी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

१९७२ च्या दुष्काळापेक्षाही यंदाची स्थिती गंभीर! राज्यात रब्बीच्या पेरण्या इतिहासात नीचांकी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ONGC मध्ये ग्रॅज्युएट/डिप्लोमा उमेदवारांसाठी 2500 पदांसाठी भरती

ONGC मध्ये अप्रेंटिसच्या ३,०४७ जागांसाठी भरती; १०वी ते पदवीधरांना संधी

November 21, 2026
जय श्रीरामच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव; श्रीराम रथोत्सवाला मोठी गर्दी

जय श्रीरामच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव; श्रीराम रथोत्सवाला मोठी गर्दी

November 21, 2026
माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर.. घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

भडगावात लग्नाच्या बहाण्याने २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार; नाशिकच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

November 21, 2026
राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपला धक्का! काँग्रेसची २,९९० जागांवर बाजी

राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपला धक्का! काँग्रेसची २,९९० जागांवर बाजी

November 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page