Friday, November 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रब्बी हंगामासाठी सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू ; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ 6 पिकांचा समावेश 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 19, 2026
in जळगाव जिल्हा
0
रब्बी हंगामातील पिक विमा उतवण्यासाठी मुदतवाढ; ही आहेत शेवटची तारीख
बातमी शेअर करा..!

जळगाव |: नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी राज्यात सन २०२६-२७ या वर्षासाठी सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामातील जिरायती ज्वारी, बागायती ज्वारी, गहू, हरभरा, रब्बी कांदा आणि उन्हाळी भुईमूग या सहा अधिसूचीत पीक प्रकारांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याची संधी असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी विमा उतरवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदार शेतकऱ्यांसह कुळाने किंवा भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरीही पात्र आहेत. मात्र, भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे.

योजनेत रब्बी ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम ३६ हजार रुपये असून शेतकरी हिस्सा एक टक्का, म्हणजे ३६० रुपये आहे. गव्हासाठी ४५ हजार रुपये विमा संरक्षण असून ०.२५ टक्के दराने ११२ रुपये ५० पैसे, हरभऱ्यासाठी ३६ हजार रुपये संरक्षण असून १.५० टक्के दराने ५४० रुपये, रब्बी कांद्यासाठी ९५ हजार रुपये संरक्षण असून ०.२५ टक्के दराने २३७ रुपये ५० पैसे, तर उन्हाळी भुईमुगासाठी ४० हजार ६०० रुपये संरक्षण असून १०१ रुपये ५० पैसे विमा हप्ता भरावा लागणार आहे. सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) अनिवार्य आहे. तसेच डिजिटल क्रॉप सर्व्हे अर्थात ई-पीक पाहणीची नोंद, बँक पासबुकची स्पष्ट प्रत, अद्ययावत आधारकार्ड आणि पीक लागवड घोषणापत्र आवश्यक आहे. विमा अर्जातील पीक आणि ई-पीक पाहणीतील नोंद यामध्ये तफावत आढळल्यास डिजिटल क्रॉप सर्व्हेतील नोंद अंतिम मानली जाईल आणि अर्ज रद्द होऊ शकतो. किमान ०.१० हेक्टर क्षेत्र असणेही आवश्यक आहे. विमा अर्ज बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा स्वतः ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.

रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर, गहू, हरभरा आणि रब्बी कांद्यासाठी १५ डिसेंबर, तर उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२७ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. चुकीच्या मार्गाने विम्याचा लाभ घेतल्याचे आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे पीक विमा तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेसारख्या कृषीविषयक डीबीटी योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे अंतिम मुदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांनी आजपासूनच पीक विमा नोंदणी करावी, असेही आवाहन कृषी विभागाने केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

MPSC उमेदवारांसाठी खुशखबर! १६ हजार ७१७ पदांच्या भरतीसाठी माहिती अपडेट करण्याची संधी

Next Post

मित्रपक्षांचाच भाजपला मोठा धक्का ! शिंदे गट-अजित पवार गटाची काँग्रेससोबत हातमिळवणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विधान परिषदेसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला? कोणाच्या वाट्याला किती जागा?

मित्रपक्षांचाच भाजपला मोठा धक्का ! शिंदे गट-अजित पवार गटाची काँग्रेससोबत हातमिळवणी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

आजच्या आज माझी नार्को टेस्ट करा, पण..; रोहित पवारांचं सरकारला थेट आव्हान

November 20, 2026
जामनेरमध्ये गावठी दारूविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट, चौघांवर गुन्हे

जामनेरमध्ये गावठी दारूविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट, चौघांवर गुन्हे

November 20, 2026
अभियांत्रिकी पदवी असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीचा चान्स; १५४३ जागांसाठी भरती सुरु

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत ३१९ जागांसाठी भरती

November 20, 2026
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

November 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page