समूह लोकगीत, लोकनृत्य, पथनाट्य, चित्रकला व कविता लेखन स्पर्धांचा समावेश;
युवकांना सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव : युवकांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, तसेच संस्कृती व परंपरांचे जतन होऊन राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने शासनामार्फत दरवर्षी जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
याच अनुषंगाने जळगाव जिल्हा युवा महोत्सव २०२६-२७ चे आयोजन शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी एम. जे. कॉलेज, जळगाव येथे करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नोंदणी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.
यंदाच्या जिल्हा युवा महोत्सवात समूह लोकगीत, समूह लोकनृत्य, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेचे नियम, सहभागी कलाकारांची संख्या, रोख पारितोषिके व इतर माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी ९८२३७७३७९७ या क्रमांकावर संपर्क साधावा ,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.














Discussion about this post