Tuesday, November 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून कोसळली; ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 17, 2026
in राष्ट्रीय, क्राईम
0
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून कोसळली; ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
बातमी शेअर करा..!

उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये मंगळवारी सकाळी भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. हरिद्वारहून चमोलीकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली बस ऋषिकेशजवळील गुलार बाजार परिसरात पुलावरून खाली कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुनिकिरेती पोलीस ठाण्याच्या हद्दीत बद्रीनाथ महामार्गावरील गुलेर परिसरात हा अपघात झाला. विश्वनाथ सेवेची बस हरिद्वारहून चमोलीच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून खाली कोसळली. बस थेट पाण्यात पडल्याने अनेक प्रवासी बसमध्ये अडकले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि एसडीआरएफच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

१९ जखमींना रुग्णालयात दाखल

अपघातानंतर एसडीआरएफ आणि पोलिसांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत १९ जखमी प्रवाशांना बाहेर काढून ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. काही प्रवासी बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

एसडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच ब्यासी आणि धलवाला चौक्यांमधील पथके तातडीने घटनास्थळी रवाना झाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर जवानांनी बचावकार्य सुरू केले. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, उत्तराखंडमध्ये आणखी एका भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यात सोमवारी रात्री लग्नसमारंभातून परतणारी कार अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली. रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कारमध्ये एकूण दहा जण प्रवास करत होते.

या दुर्घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.उत्तराखंडमध्ये अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या या दोन भीषण अपघातांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी; सुप्रिया सुळेंचा गिरीश महाजनांना फोन, बिनविरोधसाठी प्रयत्नांना वेग!

Next Post

३५ टक्के रकमेचे आमिष दाखवून जळगाव तालुक्यातील ९० महिलांची फसवणूक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

३५ टक्के रकमेचे आमिष दाखवून जळगाव तालुक्यातील ९० महिलांची फसवणूक

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नियमबाह्य वसुली भोवणार! जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १० कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू

जळगाव जिल्हा बँकेत महायुतीच्या ११ जणांची बिनविरोध निवड ; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

November 17, 2026
ठाकरेंच्या उमेदवारामुळेच मंत्री गुलाबराव पाटील बिनविरोध! जळगाव जिल्हा बँकेत नेमकं काय घडलं?

ठाकरेंच्या उमेदवारामुळेच मंत्री गुलाबराव पाटील बिनविरोध! जळगाव जिल्हा बँकेत नेमकं काय घडलं?

November 17, 2026
जळगाव जिल्ह्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’; १२० आरोपींवर गुन्हे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव जिल्ह्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’; १२० आरोपींवर गुन्हे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

November 17, 2026
महायुतीचा विधान परिषदेसाठी फॉर्म्युला ठरला? कुणाला कोणती जागा मिळणार?

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे ४ मोठे निर्णय

November 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page