जळगाव : दिवाळीच्या सणात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या चढ-उतारांदरम्यान आज भाऊबीजेच्या दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात तब्बल १ हजार ३०० रुपयांची घसरण झाली आहे. मात्र, चांदीचे दर स्थिर आहेत. त्यामुळे भाऊबीजेच्या निमित्ताने बहिणीला सोन्याची भेट देऊ इच्छिणाऱ्या भावांसाठी ही खरेदीची चांगली संधी मानली जात आहे.
आज जळगावच्या सराफ बाजारात जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ४५ हजार ७४५ रुपये झाला आहे. तर चांदीचा दर १ लाख ९५ हजार ७०० रुपये प्रति किलोवर कायम आहे. किरकोळ बाजारातही सोन्याच्या विविध कॅरेटच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १४ हजार १९८ रुपये, २२ कॅरेटचा १३ हजार १५ रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा दर १० हजार ६४९ रुपये नोंदवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या बाजारात सातत्याने बदल होत आहेत. अशातच भाऊबीजेच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दागिन्यांच्या अंतिम किमतीत जीएसटी आणि घडणावळीनुसार फरक पडू शकतो.















Discussion about this post