जळगाव : वैद्य पी. एस. चौधरी, वैद्य सी. व्ही. त्रिपाठी यांच्या वतीने धनत्रयोदशी निमित्त धन्वंतरी जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता ब्रह्मांड हॉल, मनःशांती हॉस्पिटल, मानराज पार्क, जळगाव येथे हा समारंभ पार पडणार आहे. धन्वंतरी जयंती साजरी करण्याचे हे 52 वे वर्ष आहे.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जळगावचे उपमहापौर मनोज दयाराम चौधरी राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून स्त्री व प्रसूतीरोगतज्ज्ञ डॉ. उदयसिंह पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात शल्यचिकित्सक डॉ. वासुदेव वारके (एम.एस.) आणि माजी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वासुदेव मावळे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
वैद्य पी. एस. चौधरी, वैद्य सी. व्ही. त्रिपाठी तसेच जळगाव जिल्हा वैद्य मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आरोग्य क्षेत्रातील मान्यवर, वैद्यकीय व्यावसायिक आणि नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.















Discussion about this post