Wednesday, October 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

‘ते’ वक्तव्य भोवलं! संजय राऊतांना सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; काय आहे प्रकरण?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 28, 2026
in राष्ट्रीय, महाराष्ट्र
0
एक शिंग मी तुझ्या नरड्यात कोंबल्याशिवाय राहणार नाही.. शिंदे सेनेच्या नेत्याची संजय राऊतांवर जोरदार टीका
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याबाबत सोशल मीडियावर केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पत्रकार निखिल वागळे यांनाही न्यायालयाने उपस्थित राहण्यास सांगितले असून, त्यांना पुढील सुनावणीला ऑनलाइन उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाच्या प्रतिष्ठेशी संबंधित हा विषय केवळ संबंधित व्यक्तींपुरता मर्यादित नसून संपूर्ण न्यायव्यवस्थेशी निगडित असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

भारतीय सर्वोच्च न्यायालयाबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह विधानांमुळे न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांच्या संघटनेने (SCBA) या प्रकरणी याचिका दाखल केली असून, त्यासाठी भारताच्या अॅटर्नी जनरल यांनी लेखी संमती दिली होती. या याचिकेच्या आधारे संबंधित व्यक्तींविरोधात न्यायालयाच्या अवमानाची कारवाई सुरू आहे.

निखिल वागळेंनी मागितली बिनशर्त माफी

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटण्यास नकार दिल्यानंतर पत्रकार निखिल वागळे यांनी सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणानंतर वागळे यांनी बिनशर्त माफी मागितली आणि संबंधित पोस्ट हटवली.

मात्र, संबंधित पोस्ट हटवण्यासाठी पाच दिवसांचा विलंब झाल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान उपस्थित केला. वागळे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी बाजू मांडली. वागळे यांनी आपल्या कृतीचे समर्थन केलेले नसून, त्यांना केलेल्या विधानाचा पश्चात्ताप असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

वागळेंना ऑनलाइन उपस्थितीची परवानगी

निखिल वागळे मुंबईत राहत असल्याने त्यांना पुढील सुनावणीला ऑनलाइन उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आवश्यक वाटल्यास भविष्यात त्यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात. दरम्यान, संजय राऊत यांना १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आल्याने या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळासह कायदे क्षेत्राचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या अवमानाच्या या प्रकरणात पुढील सुनावणीदरम्यान काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच १,५०० रुपये; सरकारकडून ३४४ कोटींच्या निधीला मंजुरी

Next Post

दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजवले तर कारवाई? प्रशासनाचे कडक निर्देश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजवले तर कारवाई? प्रशासनाचे कडक निर्देश

दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजवले तर कारवाई? प्रशासनाचे कडक निर्देश

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
विधानपरिषदेच्या ५ जागांवर कोण मारणार बाजी? २४ तासांनंतरही मतमोजणी सुरू, आता धक्कादायक आकडेवारी समोर

विधानपरिषद निवडणुकीत कोण आघाडीवर अन् कोण पिछाडीवर? धक्कादायक निकाल आले समोर

October 28, 2026
दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजवले तर कारवाई? प्रशासनाचे कडक निर्देश

दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजवले तर कारवाई? प्रशासनाचे कडक निर्देश

October 28, 2026
एक शिंग मी तुझ्या नरड्यात कोंबल्याशिवाय राहणार नाही.. शिंदे सेनेच्या नेत्याची संजय राऊतांवर जोरदार टीका

‘ते’ वक्तव्य भोवलं! संजय राऊतांना सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; काय आहे प्रकरण?

October 28, 2026
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच १,५०० रुपये; सरकारकडून ३४४ कोटींच्या निधीला मंजुरी

October 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page