Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

आज 1 सप्टेंबरपासून झाले हे मोठे बदल ; आताच जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 1, 2023
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
आज 1 सप्टेंबरपासून झाले हे मोठे बदल ; आताच जाणून घ्या
बातमी शेअर करा..!

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात अनेक बदल घडतात, त्याचप्रमाणे आज 1 सप्टेंबरपासून अनेक मोठे बदल होणार आहेत.या बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे.  जाणून घेऊयात, आजपासून होणाऱ्या बदलांबाबत सविस्तर…

एलपीजी सिलेंडरची किंमत

देशातील तेल आणि गॅस वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी दरांमध्ये बदल करतात. अशा परिस्थितीत एलपीजीच्या किमतींमध्येही बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच एलपीजी सिलेंडरच्या किमतींत दिलासा दिला आहे. सरकारने 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी कमी केली आहे.

आयपीओसाठी T+3 नियम

मार्केट रेग्युलेटर सेबी (SEBI) ने Initial Public Offering म्हणजेच, आयपीओ (IPO) बंद झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये कंपनीच्या स्टॉक्सची लिस्टिंग होण्याची वेळ मर्यादा अर्ध्यापर्यंत म्हणजेच, तीन दिवसांपर्यंत केली आहे. यापूर्वी ही वेळ मर्यादा सहा दिवसांची होती. लिस्टिंगच्या या नव्या नियमामुळे आयपीओ जारी करणाऱ्या कंपन्यांसोबतच इन्वेस्टमेंट करणाऱ्यांनाही फायदा होणार आहे. SEBI ने यासंदर्भात यापूर्वीच अधिसूचना जारी केली आहे. आपल्या अधिसूचनेत सेबीनं म्हटलं आहे की, 1 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यानंतर येणार्‍या सर्व IPO साठी लिस्टिंगच्या वेळेचे नवीन नियम स्वेच्छेने लागू केले जातील. तसेच, 1 डिसेंबर 2023 पासून, कंपन्यांना नियमां पालन अनिवार्यपणे करावं लागेल. SEBI ने 28 जून रोजी झालेल्या बैठकीत T+3 नियमाला मान्यता दिली होती.

‘या’ क्रेडिट कार्डचे नियम बदलणार

1 सप्टेंबर 2023 अॅक्सिस बँकेचे मॅग्नस क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची असणार आहे. सप्टेंबरच्या एक तारखेपासून या क्रेडीट कार्डाच्या अटी आणि शर्तींमध्ये मोठे बदल होऊ शकतात. बँकेच्या वेबसाईटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून ग्राहक काही व्यवहारांवर विशेष सवलतींचा लाभ घेऊ शकणार नाहीत. एवढंच नाही तर या क्रेडिट कार्डशी संबंधित आणखी एक धक्कादायक बदल पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे 1 सप्टेंबरपासून नवीन कार्डधारकांना वार्षिक शुल्कही भरावं लागणार आहे, याची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे.

आधार अपडेट करण्याची शेवटची संधी

जर तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट करायचं असेल तर तुमच्याकडे ते अपडेट करण्याची शेवटची संधी आहे. UIDAI नं आधार अपडेटची सुविधा मोफत दिली आहे. त्याची मुदत 14 सप्टेंबर रोजी संपत आहे. यापूर्वी ही सुविधा 14 जूनपर्यंत होती. त्यानंतर तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. तुम्हीही अद्याप आधार अपडेट केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आधार अपडेट करुन घ्या.

सप्टेंबरमध्ये 16 दिवस बँक हॉलिडे

सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतंही महत्त्वाचं काम असेल तर, आधीच पूर्ण करुन घ्या. कारण संपूर्ण महिन्याभरात तब्बल 16 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. RBI ने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या सण आणि कार्यक्रमांनुसार या बँक सुट्ट्या बदलू शकतात. यामध्ये रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. एकीकडे कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी हे सण पुढील महिन्यात 2023 च्या सप्टेंबरमध्ये येत आहेत, तर दुसरीकडे 3, 9, 10, 17, 23 आणि 24 सप्टेंबरला रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार यामुळे बँकांमध्ये कामकाज होणार नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आजपासून स्वस्त होऊ शकतात या 150 प्रकारची औषधे, जाणून घ्या कोणत्या आहे

Next Post

खुशखबर!! सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, पहा नवे दर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

खुशखबर!! सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, पहा नवे दर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अमळनेर हादरले! सेल्फीच्या नादात ३ मुलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू

अमळनेर हादरले! सेल्फीच्या नादात ३ मुलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू

July 7, 2026
जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

July 7, 2026
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

तृतीयपंथीयांसाठी ‘बीज भांडवल योजना’; व्यवसायासाठी मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज अन् ४५ टक्के अनुदान

July 7, 2026
हो, आम्हीच ढगफुटी केली ; हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर

हो, आम्हीच ढगफुटी केली ; हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर

July 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page