Wednesday, September 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 23, 2026
in राष्ट्रीय
0
निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । गेल्या काही काळापासून देशातील निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि निष्पक्षतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच आता निवडणूक आयोगाच्या अंतर्गतच मोठा वाद समोर आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या काही महत्त्वपूर्ण निर्णयांविरोधात दोन निवडणूक आयुक्त – सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी आक्रमक भूमिका घेत सविस्तर आक्षेप नोंदवल्याचे उघडकीस आले आहे. मतदार यादीतून नावे वगळण्यासह एसआयआर (SIR) प्रक्रियेवरून आयोगात ‘एकाविरुद्ध दोन’ असा सामना रंगल्याची चर्चा आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या रिपोर्टचा गौप्यस्फोट

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या एका रिपोर्टनुसार, तीन सदस्यीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेवर वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. देशभरात एसआयआरच्या अंमलबजावणीवर तीनही निवडणूक आयुक्त देखरेख करत असतानाच, आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मागील १० महिन्यांत किमान १४ वेळा अधिकृत नोंदीवर आपले आक्षेप नोंदवले आहेत. विशेष म्हणजे, यातील तब्बल चार आक्षेप एकाच दिवशी नोंदवण्यात आल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

या आक्षेपांचा संबंध मतदार नोंदणी, मतदार यादीतून नावे वगळणे किंवा पुन्हा समाविष्ट करणे, अपील प्रक्रिया तसेच मतदार यादीशी संबंधित डिजिटल प्रणाली आणि डेटाच्या व्यवस्थापनाशी असल्याचे इंडियन एक्स्प्रेसने म्हटले आहे. काही निर्णय आपल्याला माहिती नसताना किंवा आवश्यक मंजुरीशिवाय घेण्यात आल्याचा दावा दोन्ही आयुक्तांनी आपल्या नोंदींमध्ये केल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या Form-6 मध्ये एसआयआरशी संबंधित प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. या बदलावर विवेक जोशी यांनी मे महिन्यात आक्षेप नोंदवला होता. त्यांच्या मते, Form-6 हा कायदेशीर नियमांनुसार निर्धारित केलेला अर्ज असल्याने त्यात बदल करण्यासाठी संबंधित नियमांमध्ये सुधारणा आवश्यक आहे. सुखबीर सिंह संधू यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

याशिवाय मतदार यादीच्या डेटाबेसवर केंद्रीय पातळीवर नियंत्रण वाढत असल्याबाबतही दोन्ही आयुक्तांनी चिंता व्यक्त केल्याचे वृत्त आहे. निवडणूक यादीच्या डिजिटल प्रणालीतील बदलांबाबत त्यांनी कॅबिनेट सचिवांकडेही पत्रव्यवहार केल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, देशातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मसुदा मतदार याद्यांमधून १३ कोटींपेक्षा अधिक नावे वगळण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये एसआयआरअंतर्गत २७.१६ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती. त्यापैकी २२ लाखांहून अधिक मतदारांनी नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी अपील केल्याची माहिती निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.

निवडणूक आयोगाची भूमिका काय?

दरम्यान, दोन निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतल्याच्या वृत्तानंतर निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी अंतर्गत मतभेद असल्याचे वृत्त फेटाळले आहे. आयोगाच्या सूत्रांनुसार, एसआयआरसह आयोगाने घेतलेले सर्व निर्णय एकमताने घेण्यात आले असून, त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह दोन्ही निवडणूक आयुक्तांची मंजुरी होती. त्यामुळे काही मुद्द्यांवर आयुक्तांनी चिंता किंवा आक्षेप नोंदवले असले तरी अंतिम निर्णयांमध्ये मतभेद नव्हता, अशी आयोगाची भूमिका आहे.

या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अंतर्गत कामकाजाबाबत समोर आलेल्या या माहितीकडे आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टमधील दावे आणि निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली स्पष्टीकरणात्मक भूमिका या दोन्ही बाबी सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खान्देशात काँग्रेसला धक्का ; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

Next Post

निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

September 23, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

खान्देशात काँग्रेसला धक्का ; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

September 23, 2026
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

“लोकशाही वाचवायची असेल तर…निवडणूक आयोगावरून उद्धव ठाकरेंची दंड थोपटले; वाचा काय म्हणाले

September 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page