केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेमध्ये विविध पदांच्या तब्बल ११० रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२६ आहे.

या भरतीमध्ये इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) 7, इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड-I (सिव्हिल) 1, इंजिनिअरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) 10, इंजिनिअरिंग असिस्टंट (मेकॅनिकल) 1, सायंटिफिक असिस्टंट 2, टेक्निशियन ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) 7, टेक्निशियन ग्रेड-I (मेकॅनिकल) 2, टेक्निकल अटेंडंट 37, असिस्टंट ग्रेड-II 29 आणि MTS ग्रेड-Iची 14 पदे आहेत.

भरतीसाठी पात्रता काय?
इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड-I पदासाठी संबंधित शाखेतील प्रथम श्रेणी B.E./B.Tech पदवी तसेच GATE 2024, 2025 किंवा 2026 गुण आवश्यक आहेत. इंजिनिअरिंग असिस्टंट व सायंटिफिक असिस्टंट पदांसाठी संबंधित विषयातील पदवी किंवा डिप्लोमा आणि आवश्यक अनुभव मागविण्यात आला आहे.
टेक्निशियन पदांसाठी संबंधित ट्रेडमधील ITI, टेक्निकल अटेंडंट आणि MTS पदांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. असिस्टंट ग्रेड-II पदासाठी प्रथम श्रेणी BA, B.Sc., B.Com, BBA, BBM किंवा BCA तसेच मूलभूत संगणक अभ्यासक्रम (BCC) आवश्यक आहे.
अर्ज शुल्क
इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड १, सायंटिफिक असिस्टंट आणि इंजिनिअरिंग असिस्टंट पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ₹१,००० शुल्क भरावे लागेल, तर टेक्निशियन ग्रेड १, असिस्टंट ग्रेड २ आणि टेक्निकल अटेंडंट ग्रेड १ पदांसाठी अर्ज करणाऱ्यांना ₹७०० शुल्क भरावे लागेल. शुल्क भरणा ऑनलाइन करता येईल.
अर्ज प्रक्रिया
भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी, सर्वप्रथम cpri-app.onlineapplication.org.in/#/ या पोर्टलला भेट द्या.
होम पेजवरील “नोंदणी करा” (Register) वर क्लिक करा आणि नोंदणी करण्यासाठी आवश्यक तपशील भरा.
नोंदणीनंतर, लॉगिनद्वारे इतर तपशील भरून अर्ज पूर्ण करा.
तुमची सही आणि छायाचित्र अपलोड करा.
विहित शुल्क भरल्यानंतर अर्ज सादर करा.
भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट काढून जतन करा.















Discussion about this post