सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) अंतर्गत येणाऱ्या ISRO Propulsion Complex (IPRC), महेंद्रगिरी, तामिळनाडू येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीमध्ये १०वी, ITI तसेच डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार अर्ज करता येणार आहे.

या भरती मोहिमेत टेक्निकल असिस्टंट, टेक्निशियन बी, कुक ए आणि फायरमन ए या पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली असून पात्र उमेदवारांना ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करता येईल.

कोणत्या पदासाठी किती जागा?
टेक्निकल असिस्टंट – ५ जागा
टेक्निशियन बी – १३ जागा
कुक ए – १ जागा
फायरमन ए – ३ जागा
टेक्निकल असिस्टंट पदांमध्ये ऑटोमोबाईल, मेकॅनिकल तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या शाखांचा समावेश आहे. तर टेक्निशियन बी पदांसाठी फिटर, मशिनिस्ट, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन आणि रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग या ट्रेडमध्ये संधी आहे.
१०वी आणि ITI उत्तीर्णांना संधी
टेक्निशियन बी पदासाठी उमेदवारांनी १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून संबंधित ट्रेडमधील ITI आणि NCVT मान्यताप्राप्त NTC किंवा NAC प्रमाणपत्र आवश्यक आहे.
कुक ए पदासाठी १०वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र मान्यताप्राप्त हॉटेल किंवा कॅन्टीनमध्ये कुक म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
फायरमन ए पदासाठी १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून निर्धारित शारीरिक कार्यक्षमता चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.
तर टेक्निकल असिस्टंट पदासाठी संबंधित अभियांत्रिकी शाखेतील प्रथम श्रेणीतील डिप्लोमा आवश्यक आहे.
पगार किती मिळणार?
या भरतीतील पदांनुसार वेगवेगळ्या वेतनश्रेणी लागू आहेत.
टेक्निकल असिस्टंट पदासाठी Pay Level-7 अंतर्गत ₹४४,९०० ते ₹१,४२,४०० वेतन मिळू शकते.
टेक्निशियन बी पदासाठी Pay Level-3 अंतर्गत ₹२१,७०० ते ₹६९,१००, तर कुक ए आणि फायरमन ए पदांसाठी Pay Level-2 अंतर्गत ₹१९,९०० ते ₹६३,२०० वेतनश्रेणी आहे.
अर्ज शुल्क किती?
टेक्निकल असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ₹७५०, तर टेक्निशियन बी, कुक ए आणि फायरमन ए पदांसाठी ₹५०० अर्ज शुल्क भरावे लागेल.
निवड प्रक्रिया कशी असेल?
टेक्निकल असिस्टंट आणि टेक्निशियन बी पदांसाठी लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी घेतली जाईल. कुक ए पदासाठी लेखी परीक्षेसोबत कौशल्य चाचणी असेल.
फायरमन ए पदासाठी लेखी परीक्षेनंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि वैद्यकीय तपासणी होईल.
अर्ज कसा करायचा?
पात्र उमेदवारांनी IPRCच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना प्रथम नोंदणी करून वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरावे आणि अर्ज अंतिमरित्या सबमिट करावा. अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रत आणि शुल्क भरल्याची पावती भविष्यातील प्रक्रियेसाठी सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
अर्जाची अंतिम तारीख : ५ ऑक्टोबर २०२६
१०वी, ITI किंवा संबंधित डिप्लोमा पात्रता असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पदनिहाय शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण आणि इतर अटी अधिकृत जाहिरातीत तपासणे आवश्यक आहे.















Discussion about this post