Thursday, September 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पावसाची उघडीप अन् जळगावात उकाडा वाढला; पुढील काही दिवसांसाठी हवामान विभागाचा अंदाज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 17, 2026
in जळगाव जिल्हा
0
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावल्यानंर पुन्हा एकदा पावसाने उघडदीप दिली असून दुसरीकडे जिल्ह्यात उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली. तर उर्वरित राज्यात उघडीप राहून ढगाळ हवामान आणि ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

जळगावात तापमानाचा पारा ३३ अंशांवर

जळगावच्या तापमानात उघडीपेमुळे वाढ झाली आहे. १६ सप्टेंबर रोजी जळगावात कमाल तापमान ३३.७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. या २४ तासांत जळगावात पावसाची नोंद झाली नाही.

आज, १७ सप्टेंबर रोजी जळगावात कमाल तापमान सुमारे ३३ अंश, तर किमान तापमान २२ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. १८ ते २२ सप्टेंबरदरम्यानही कमाल तापमान ३४ ते ३५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर तसेच बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या भागांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. राज्यातील इतर भागांत मात्र पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळू शकतो.

बंगालच्या उपसागरात पुन्हा हालचाली

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीवरही हवामान विभागाचे लक्ष आहे. उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, त्याचा पुढील काळातील पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत असताना अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, देशातील अनेक भागांत १७ ते २२ सप्टेंबरदरम्यान पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता असल्याचे IMDच्या ताज्या अंदाजात नमूद करण्यात आले आहे.

जळगावकरांना पुन्हा पावसाची प्रतीक्षा

एकीकडे जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने तापमान वाढत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे लक्ष पुन्हा पावसाकडे लागले आहे. सध्या जळगावात तापमान ३३ अंशांच्या आसपास असून, आगामी काही दिवसांत हलक्या सरींची शक्यता असली तरी मोठ्या पावसासाठी अद्याप प्रतीक्षा कायम आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जमीनमालकांसाठी मोठी बातमी; कर्ज घेताना एनए परवानगीची सक्ती संपली!

Next Post

गणेशोत्सवात सोने-चांदी खरेदीदारांना दिलासा! जळगावात सोनं ₹१,७५१, तर चांदी ₹३,०९० ने स्वस्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

गणेशोत्सवात सोने-चांदी खरेदीदारांना दिलासा! जळगावात सोनं ₹१,७५१, तर चांदी ₹३,०९० ने स्वस्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारतीय अंतराळ संशोधन संस्थामध्ये 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

ISRO मध्ये १०वी, ITI उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; पगार ₹१.४२ लाखांपर्यंत मिळणार

September 17, 2026
मी मुख्यमंत्री असतो तर…; उद्धव ठाकरेंचे राज्य सरकारवर हल्लाबोल

‘पुढच्या वेळी भाजप सत्ता पाहणार नाही’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा, मराठवाड्यासाठी केली मोठी मागणी

September 17, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

गणेशोत्सवात सोने-चांदी खरेदीदारांना दिलासा! जळगावात सोनं ₹१,७५१, तर चांदी ₹३,०९० ने स्वस्त

September 17, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

पावसाची उघडीप अन् जळगावात उकाडा वाढला; पुढील काही दिवसांसाठी हवामान विभागाचा अंदाज

September 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page