Friday, October 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘महा वॉकेथॉन’ला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; जलसंधारणाची शपथ घेऊन जलसमृद्ध जिल्ह्याचा संकल्प

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 21, 2026
in जळगाव जिल्हा
0
‘महा वॉकेथॉन’ला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; जलसंधारणाची शपथ घेऊन जलसमृद्ध जिल्ह्याचा संकल्प
बातमी शेअर करा..!

पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

‘वॉक फॉर वॉटर’मधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा’चा जागर; जलसंधारण अभियान १०० टक्के यशस्वी करण्याचे आवाहन

जळगाव । पाण्याचा प्रश्न आता उद्याचा राहिलेला नसून तो आजचाच प्रश्न आहे. पाऊस किती आणि कधी पडेल हे आपल्या हातात नाही; मात्र पडलेले पाणी वाहून जाऊ न देता ते अडवणे आणि जमिनीत जिरवणे आपल्या हातात आहे. पाणीटंचाईवर दीर्घकालीन मात करायची असेल, तर वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवावा लागेल. जलसंधारण हा केवळ शासनाचा कार्यक्रम न राहता लोकसहभागातून त्याला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप दिले पाहिजे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जलसंधारण दिनानिमित्त जळगाव येथील सागर पार्क येथे आयोजित ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून महा वॉकेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपवनसंरक्षक सौरीश सहाय ,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री संतोष भोसले, कार्यकारी अभियंता विनोद पाटील, उत्तम दाभाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र देत राज्यातील जलसंधारणाच्या कामाला व्यापक दिशा दिली. त्यांच्या जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची प्रेरणा कायम राहावी, यासाठी त्यांच्या जन्मदिनी २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येतो.

“आज ‘वॉक फॉर वॉटर’मध्ये सहभागी होऊन पाण्यासाठी चालणारा प्रत्येक नागरिक या चळवळीचा खऱ्या अर्थाने भागीदार झाला आहे. आपल्या प्रत्येक पावलातून गावागावात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवा’ हा संदेश पोहोचला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

शासनाने १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केवळ आजचा कार्यक्रम झाला म्हणजे अभियान संपले असे न मानता गावागावातील नाले, तलाव आणि पाझर तलावांची स्वच्छता तसेच पाणी अडविण्याची व जिरविण्याची कामे लोकसहभागातून हाती घेतली पाहिजेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हे अभियान प्रत्यक्ष कामातून प्रभावीपणे राबवावे. त्याचबरोबर नागरिकांनीही केवळ शासनावर अवलंबून न राहता आपल्या गावातील पाणी आपल्या गावातच अडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

पाणी वाचविणे हा केवळ शेतकरी अथवा ग्रामीण भागाचा विषय नसून शहरातील प्रत्येक नागरिकाचीही तितकीच जबाबदारी आहे. विशेषतः तरुणांनी पाणी जपण्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी. “आजची वॉकेथॉन काही किलोमीटरवर संपेल; मात्र ‘पाणी वाचवायचे आणि पुढच्या पिढीसाठी जपायचे’ हा विचार इथे थांबता कामा नये. तो प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे,” असेही त्यांनी नमूद केले.

‘वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून निर्माण झालेली जनजागृती गावागावात प्रत्यक्ष जलसंधारणाच्या कामात रूपांतरित झाली पाहिजे. ‘पाणी अडवायचे, पाणी जिरवायचे, पाणी वाचवायचे आणि जळगाव जिल्हा जलसमृद्ध करायचा’ हा संकल्प प्रत्येकाने करावा आणि जलसंधारण अभियान १०० टक्के यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

कार्यक्रमात उपस्थितांना जलसंधारण व पाणी बचतीची शपथ देण्यात आली. महा वॉकेथॉनच्या समारोपप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संदीप केदार यांनी केले, तर आभार जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश पारधी यांनी मानले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

SBI ग्राहकांनो, 1 ऑक्टोबरपासून खिशाला लागणार कात्री; ATMचे शुल्क वाढले

Next Post

म्हणून साखर महागली; काँग्रेसचा मोदी सरकारवर जोरदार निशाणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
म्हणून साखर महागली; काँग्रेसचा मोदी सरकारवर जोरदार निशाणा

म्हणून साखर महागली; काँग्रेसचा मोदी सरकारवर जोरदार निशाणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?

सोन्याने पुन्हा डोके वर काढले! जळगावच्या सराफ बाजारात तोळ्यामागे १,२०० रुपयांची वाढ

October 9, 2026
CJP आंदोलनापूर्वी रेल्वेचा मोठा निर्णय; दिल्लीला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

CJP आंदोलनापूर्वी रेल्वेचा मोठा निर्णय; दिल्लीला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

October 9, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

पैशांच्या वादातून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाच्या भावासह दोघांना अटक, एक पसार

October 9, 2026
महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा तडाखा; या ६ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट

महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा तडाखा; या ६ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट

October 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page