Thursday, August 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

आधी चोरी करताना पकडले, नंतर प्राचार्यांची हत्या; दहावीच्या विद्यार्थ्यांचा धक्कादायक कारनामा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 20, 2026
in राष्ट्रीय, क्राईम
0
आधी चोरी करताना पकडले, नंतर प्राचार्यांची हत्या; दहावीच्या विद्यार्थ्यांचा धक्कादायक कारनामा
बातमी शेअर करा..!

नलगोंडा : तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात खासगी शाळेच्या प्राचार्य तथा संचालक रूपा रेड्डी यांच्या राहत्या घरात झालेल्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याच शाळेतील इयत्ता दहावीच्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. घरात चोरी करण्यासाठी शिरलेल्या या दोन्ही विद्यार्थ्यांनी पकडले जाण्याच्या भीतीने रूपा रेड्डी यांच्यावर चाकूने तब्बल २७ वार करून त्यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

११ ऑगस्ट रोजी रूपा रेड्डी या त्यांच्या घरात एकट्या असताना त्यांची हत्या करण्यात आली. हत्येपूर्वी त्या आपल्या मावशीसोबत फोनवर बोलत होत्या. फोन कट होण्यापूर्वी त्यांनी ‘बाबू’ असा शब्द उच्चारला होता. तेलुगू भाषेत तसेच शाळेतही विद्यार्थ्यांना प्रेमाने ‘बाबू’ असे संबोधले जात असल्याने पोलिसांनी या शब्दाला महत्त्व दिले. या धाग्यावरून पोलिसांनी तपासाची दिशा बदलत शाळेतील विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले. तपासादरम्यान दहावीतील दोन विद्यार्थ्यांच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या लक्षात आल्या.

रूपा रेड्डी यांच्या हत्येनंतर दहावीतील हे दोन्ही विद्यार्थी अचानक मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू लागले. मित्रांसोबत पार्ट्या करण्यासह महागड्या वस्तू खरेदी केल्याचेही समोर आले.नलगोंडाचे पोलीस अधीक्षक शरत चंद्र पवार यांच्या माहितीनुसार, संशय बळावल्यानंतर पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. चौकशीत एका विद्यार्थ्याकडून १ लाख ५१ हजार रुपये रोख आणि आयफोन जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, जप्त केलेल्या नोटांवर मानवी रक्ताचे डाग आढळून आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि हत्येचा पर्दाफाश झाला.

आधीही चोरी करताना आढळला होता विद्यार्थी

तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. हत्येच्या सुमारे १५ दिवस आधी यातील एक विद्यार्थी रूपा रेड्डी यांच्या नजरेत आला होता. शाळेच्या मुख्याध्यापकांसह काही कर्मचाऱ्यांनी त्याला बॅगेत मोबाईल फोन आणि रोख रक्कम घेऊन जाताना पकडले होते. त्यावेळी त्याला समज देण्यात आली होती.यानंतर रूपा रेड्डी यांनी संबंधित विद्यार्थ्याला वसतिगृहातून काढून केवळ नियमित वर्गांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याच्या मनात राग निर्माण झाला होता का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

फी जमा होत असल्याने आखला चोरीचा कट
११ ऑगस्ट रोजी शाळेत विद्यार्थ्यांची फी जमा होत असल्याने प्राचार्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असू शकते, असा अंदाज दोन्ही विद्यार्थ्यांनी बांधला. त्यानुसार त्यांनी हत्येच्या सुमारे पाच दिवस आधी चोरीचा कट आखल्याचे तपासात समोर आले.

घटनेच्या दिवशी दोन्ही विद्यार्थी रूपा रेड्डी यांच्या घरात शिरले. चोरी करत असताना रूपा यांनी त्यातील एका विद्यार्थ्याला पाहिले. आपली ओळख पटेल आणि चोरीचा भांडाफोड होईल, या भीतीने त्याने रूपा रेड्डी यांच्यावर चाकूने तब्बल २७ वार केले. त्यानंतर सुमारे २ लाख ५० हजार रुपये घेऊन तो घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा साथीदार घराबाहेर उभा असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केले. आता पुढील प्रक्रियेनुसार त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शिवसेना पक्ष-चिन्ह कोणाचे? सुप्रीम कोर्टात अंतिम युक्तिवाद

Next Post

जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांना मातृशोक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांना मातृशोक

जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांना मातृशोक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सुट्ट्या खाद्यतेल विक्रीबाबत तुकाराम मुंडेंची मोठी घोषणा

सुट्ट्या खाद्यतेल विक्रीबाबत तुकाराम मुंडेंची मोठी घोषणा

August 20, 2026
तरुणांसाठी सुवर्णसंधी! पीएम इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू; ३१ हजारांहून अधिक संधी उपलब्ध

जळगाव जिल्ह्यात ८ इंटर्नशिपच्या संधी; इतके विद्यावेतन मिळणार? दहावी पास उमेदवारांनाही संधी

August 20, 2026
जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांना मातृशोक

जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांना मातृशोक

August 20, 2026
आधी चोरी करताना पकडले, नंतर प्राचार्यांची हत्या; दहावीच्या विद्यार्थ्यांचा धक्कादायक कारनामा

आधी चोरी करताना पकडले, नंतर प्राचार्यांची हत्या; दहावीच्या विद्यार्थ्यांचा धक्कादायक कारनामा

August 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page