Thursday, August 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सणासुदीत सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार? अंडी-चिकनपासून लसूण-कांद्यापर्यंत सगळं महागलं

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 13, 2026
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
सणासुदीत सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार? अंडी-चिकनपासून लसूण-कांद्यापर्यंत सगळं महागलं
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित पुन्हा एकदा बिघडण्याची शक्यता आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून खाद्यपदार्थ, बाहेरचे खाणे आणि वाहतूक खर्चापर्यंत विविध बाबींमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांच्या मासिक बजेटवर मोठा परिणाम होत आहे. जुलै महिन्यात देशातील महागाई दर ४.४५ टक्क्यांवर पोहोचला असून, जूनमध्ये हा दर ४.३८ टक्के होता. आगामी ऑगस्ट महिन्यात सणासुदीचा काळ असल्याने महागाईचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः खाद्यपदार्थांच्या किमतीतील वाढ सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

खाद्यपदार्थांच्या किमतीत ५.५२ टक्के वाढ

जुलैमध्ये खाद्यपदार्थांच्या किमतीत ५.५२ टक्क्यांची वाढ झाली. असमान मान्सून आणि बदलत्या हवामानाचा परिणाम भाजीपाला आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमतींवर झाला आहे. कांदा, आले आणि लसूण यांच्या दरात वाढ झाली असून, अंडी, चिकन आणि खाद्यतेलाच्या किमतीतही तेजी दिसून आली.

महाराष्ट्रात नुकत्याच वाढलेल्या दूध दराचाही घरगुती खर्चावर परिणाम होत आहे. त्यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या कुटुंबांच्या बजेटवर आणखी भार पडण्याची शक्यता आहे. केवळ घरगुती वस्तूच नव्हे, तर बाहेर खाणे आणि राहण्याचा खर्चही वाढला आहे. रेस्टॉरंट आणि अकोमोडेशन क्षेत्रातील महागाईचा दर जुलैमध्ये ७.७२ टक्क्यांवर पोहोचला. जूनमध्ये हा दर ६.९१ टक्के होता.कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीचा परिणाम वाहतूक खर्चावरही होत आहे. दैनंदिन वापरातील विविध वस्तूंच्या किमतीतही वाढ नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, कोअर महागाई ३.८ ते ४.३ टक्क्यांच्या आसपास स्थिर राहिल्याने अर्थव्यवस्थेला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, खाद्य महागाईचा दबाव कायम राहिल्यास आगामी काळात परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.बोफा सिक्युरिटीजने असमान पाऊस आणि अल-निनोचा धोका लक्षात घेता पुढील काळात खाद्य महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. महागाईचा दबाव वाढल्यास रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहा महिन्यांत व्याजदरात एकूण ५० बेसिस पॉइंट्सची वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

त्यामुळे सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांसह दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीवर नागरिकांचे विशेष लक्ष राहणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शिंदे गटाच्या नव्या कार्यकारिणीवर कपिल सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

Next Post

युवकांनो रील बनवा अन् जिंका २५ हजार रुपये; माती-पाणी संवर्धनावर राज्यस्तरीय स्पर्धा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
युवकांनो रील बनवा अन् जिंका २५ हजार रुपये; माती-पाणी संवर्धनावर राज्यस्तरीय स्पर्धा

युवकांनो रील बनवा अन् जिंका २५ हजार रुपये; माती-पाणी संवर्धनावर राज्यस्तरीय स्पर्धा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ३/२५’ !  ७ गावठी कट्टे, ११ जिवंत राऊंडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ३/२५’ ! ७ गावठी कट्टे, ११ जिवंत राऊंडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

August 13, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

‘भोळा राहिलो तर भाजपवाले खातील’ ! जळगावात व्यासपीठावर मंत्री गुलाबराव पाटलांची राजकीय फटकेबाजी

August 13, 2026
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला; आरोपी ताब्यात

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला; आरोपी ताब्यात

August 13, 2026
युवकांनो रील बनवा अन् जिंका २५ हजार रुपये; माती-पाणी संवर्धनावर राज्यस्तरीय स्पर्धा

युवकांनो रील बनवा अन् जिंका २५ हजार रुपये; माती-पाणी संवर्धनावर राज्यस्तरीय स्पर्धा

August 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page