Tuesday, September 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘मीच, मीच’ म्हणत किती दिवस चालणार?; गिरीश महाजनांचा नाव न घेता एकनाथ खडसेंवर टोला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 28, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील राजकारणात मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक चकमक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका विकासकामांच्या कार्यक्रमात आमदार मंगेश चव्हाण यांचे कौतुक करताना गिरीश महाजन यांनी नाव न घेता एकनाथ खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांच्या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कार्यक्रमात बोलताना मंत्री महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या विकासकामांचे भरभरून कौतुक केले. “मोठी दूरदृष्टी ठेवून मंगेश चव्हाण यांनी दर्जेदार विकासकामे केली आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. महाराष्ट्रातही एवढ्या दर्जाची कामे क्वचितच पाहायला मिळतील,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी मंगेश चव्हाण यांना उमेदवारी देतानाचा किस्साही सांगितला. “पहिल्यांदा त्यांना विधानसभेची उमेदवारी देताना मी माझी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तेव्हा ते चार हजार मतांनी विजयी झाले. मात्र पुढील निवडणुकीत त्यांनी तब्बल ८६ हजार मतांनी विजय मिळवत सर्व अपेक्षा पूर्ण केल्या. आता त्यांनी इथेच न थांबता आमचा सात वेळा निवडून येण्याचा विक्रमही मोडावा. भाजपचा भविष्यातील नेता म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो,” असे महाजन म्हणाले.

भाषणादरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांनाही महाजन यांनी मिश्कील टोला लगावला. “माझं वय सांगत नाही, नाहीतर पुन्हा गुलाबराव पाटील त्यावर टिप्पणी करतील,” असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यावर गुलाबराव पाटील यांनीही “मी महाजनांपेक्षा लहान आहे,” असे म्हणत हलक्याफुलक्या शैलीत उत्तर दिले.

यानंतर महाजन यांनी नाव न घेता एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला. “आपणही कुठेतरी थांबलं पाहिजे. स्मशानात जाईपर्यंत ‘मीच, मीच’ म्हणत राहायचं? उठल्या-बसल्या ‘मीच’ असं म्हणणं लोकांना चालणार नाही. भविष्यात जिल्ह्याची जबाबदारी ज्याच्याकडे द्यायची, तो नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमदार मंगेश चव्हाण आहेत,” असे वक्तव्य त्यांनी केले.

यावेळी महाजन यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचाही उल्लेख केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचे चित्र बदलले आहे. सर्वत्र सिमेंटचे रस्ते झाले आहेत. कोणतीही निवडणूक नसतानाही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सरकारने मोठा आधार दिला,” असेही ते म्हणाले.

महाजन यांच्या या वक्तव्यांमुळे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, आता यावर एकनाथ खडसे काय प्रतिक्रिया देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कर्जबाजारीपणा आणि नैराश्यातून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; अमळनेर तालुक्यातील घटना

Next Post

आनंदाची बातमी ! भारतीय रेल्वेत ४,०९८ पदांची मेगाभरती; ₹35,400 पगार मिळेल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

आनंदाची बातमी ! भारतीय रेल्वेत ४,०९८ पदांची मेगाभरती; ₹35,400 पगार मिळेल

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

८०० रुपयांसाठी आत्तेभावाने संपवले मामेभावाला; भडगावातील खळबळजनक घटना

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

September 22, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

MPSCचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा येणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं ; म्हणाले…

September 22, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा! पुढील ४ दिवस कुठे-कुठे यलो अलर्ट?

September 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page