भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) देशभरातील ४,०९८ ज्युनिअर इंजिनिअर (JE) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १४ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाइन अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर २०२६ आहे.
आरआरबीच्या अधिसूचनेनुसार, देशभरातील विविध रेल्वे विभागांमध्ये एकूण ४,०९८ ज्युनिअर इंजिनिअर पदे भरली जाणार आहेत. पदांबाबतची सविस्तर माहिती, शाखानिहाय रिक्त जागा आणि इतर अटी-शर्ती लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या सविस्तर अधिसूचनेत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
कोण अर्ज करू शकतात?
सविस्तर शैक्षणिक पात्रता तपशीलवार अधिसूचनेत जाहीर केली जाईल. संबंधित अभियांत्रिकी शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा पदवी असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. पदासाठीच्या पात्रतेचा संपूर्ण तपशील अधिसूचनेत दिला जाईल.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३३ वर्षे असावे. शासनाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाला ५ वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची सवलत मिळणार आहे.
वेतन किती?
निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल-६ वेतनश्रेणीनुसार दरमहा ₹35,400 मूलभूत वेतनासह इतर भत्ते मिळणार आहेत.
अर्ज प्रक्रिया
आरआरबी ज्युनिअर इंजिनिअर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १४ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होईल. इच्छुक उमेदवारांनी संबंधित आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड कराव्यात. अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट सुरक्षित ठेवावी.














Discussion about this post