केंद्र लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत प्रिन्सिपल आणि व्हाइस-प्रिन्सिपल पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ८२८ रिक्त पदे भरली जाणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे.
या भरतीमध्ये प्रिन्सिपलची १२४ तर व्हाइस-प्रिन्सिपलची ७०४ पदे भरली जाणार आहेत. प्रिन्सिपल पदासाठी उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी, बी.एड. आणि १० वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तर व्हाइस-प्रिन्सिपल पदासाठी पदव्युत्तर पदवी, बी.एड. तसेच पीजीटी (PGT) म्हणून दोन वर्षांचा किंवा टीजीटी (TGT) म्हणून तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादेनुसार प्रिन्सिपल पदासाठी कमाल वय ५० वर्षे, तर व्हाइस-प्रिन्सिपल पदासाठी ३५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. वयाची गणना १४ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात येणार असून अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) उमेदवारांना ५ वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती दिल्ली येथे करण्यात येणार आहे. अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ₹२५ असून SC/ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२६ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) आहे. तसेच कंप्युटर आधारित भरती परीक्षा (CRT) १ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
शिक्षण क्षेत्रात शासकीय नोकरीची संधी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची मानली जात असून, इच्छुकांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post