जळगाव : दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जळगाव शहरात प्रतिसाद मिळताना दिसला. सकाळपासूनच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून व्यापारी व दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.
फुले मार्केट, गोलाणी मार्केटसह शहरातील विविध भागांत कार्यकर्त्यांनी फेरी काढत व्यापाऱ्यांशी संवाद साधला. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दुकानदारांनी स्वेच्छेने आपली दुकाने बंद ठेवली.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याचा निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडीने राज्यभर बंदचे आवाहन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जळगावातही आंदोलनाची तीव्रता वाढलेली पाहायला मिळत आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रमुख बाजारपेठा आणि चौकांमध्ये पोलिसांची नजर ठेवण्यात आली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष जितेंद्र केदार यांनी बंदच्या उद्देशाबाबत भूमिका मांडत, विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.















Discussion about this post