सरकारी क्षेत्रात आणि वैद्यकीय संस्थेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि सुवर्णसंधी चालून आली आहे. अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने (AIIMS) सामायिक भरती परीक्षा (CRE-५) अंतर्गत गट ‘ब’ (Group B) आणि गट ‘क’ (Group C) पदांच्या भरतीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. या भव्य भरती मोहिमेद्वारे देशभरातील विविध ‘एम्स’ संस्था आणि इतर आरोग्यसेवा संस्थांमधील एकूण १,४८४ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
पात्र आणि इच्छुक उमेदवार एम्सच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत आहे.
पदांचा नाव आणि शैक्षणिक पात्रता
या भरती मोहिमेअंतर्गत प्रशासकीय, तांत्रिक (Technical), प्रयोगशाळा (Laboratory), नर्सिंग सपोर्ट आणि लिपिक (Clerical) अशा विविध विभागांतील पदे भरली जातील.
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदानुसार पदवी (Graduation), पदव्युत्तर पदवी (Post Graduation), डिप्लोमा (Diploma) किंवा संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा आणि सवलत
पदानुसार कमाल वयोमर्यादा २७ वर्षे, ३० वर्षे आणि ३५ वर्षे अशी ठेवण्यात आली आहे. नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल:
SC/ST उमेदवार: ५ वर्षे सवलत
OBC उमेदवार: ३ वर्षे सवलत
दिव्यांग (PwBD) उमेदवार: १० वर्षे सवलत
अर्ज शुल्क
उमेदवारांना त्यांच्या प्रवर्गानुसार ऑनलाइन फी भरणे बंधनकारक आहे:
सर्वसाधारण (General) आणि OBC: ₹३,०००/-
SC, ST आणि EWS प्रवर्ग: ₹२,४००/-
दिव्यांग (PwBD) उमेदवार: शुल्क पूर्णपणे माफ (मोफत)
निवड प्रक्रिया आणि परीक्षेचा नमुना
परीक्षा पद्धती: उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT) द्वारे केली जाईल.
परीक्षेचे स्वरूप: परीक्षेत एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न (MCQs) विचारले जातील. यामध्ये सामान्य ज्ञान (GK), संगणक ज्ञान (Computer Knowledge) आणि संबंधित विषयांवर आधारित प्रश्नांचा समावेश असेल.
परीक्षेची तारीख: जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, ही परीक्षा २५ जुलै ते २७ जुलै २०२६ दरम्यान घेतली जाईल.
अर्ज कसा कराल?
इच्छुक उमेदवारांनी AIIMS च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रथम नोंदणी करावी. त्यानंतर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि शुल्क भरून अर्ज अंतिम सादर करावा. अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post