Monday, June 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

धक्कादायक ! जयपूरमध्ये कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दीपकेंना मारहाण; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 15, 2026
in राष्ट्रीय
0
धक्कादायक ! जयपूरमध्ये कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दीपकेंना मारहाण; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बातमी शेअर करा..!

जयपूर । ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात वातावरण तापले असतानाच, या घोटाळ्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे ‘कॉकरोच जनता पक्षा’चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांना राजस्थानच्या जयपूरमध्ये एका आंदोलनादरम्यान मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने दीपके यांच्यावर थेट हल्ला केला असून, या घटनेनंतर आंदोलनस्थळी आणि राजकीय वर्तुळात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मारहाणीचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

‘नीट’ पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पक्षाकडून देशभरात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. दिल्लीतील जंतर-मंतर आणि पुण्यात यशस्वी आंदोलन केल्यानंतर अभिजीत दीपके हे शेकडो तरुणांच्या उपस्थितीत जयपूरमध्ये आंदोलनासाठी पोहोचले होते. आंदोलनस्थळी पोहोचताच जमलेल्या तरुणांनी दीपके यांचे जंगी स्वागत केले. काही उत्साही तरुणांनी त्यांना खांद्यावर घेतले असतानाच, गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात तरुणाने पुढे येत दीपके यांना थेट मारहाण करण्यास सुरुवात केली.

अभिजीत दीपके यांच्यावर झालेल्या या अचानक हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि तरुणांनी तातडीने संबंधित हल्लेखोर तरुणाला जागीच घेरले आणि त्याची धुलाई करण्यास सुरुवात केली. यामुळे काही काळ आंदोलनस्थळी प्रचंड गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून स्वतः अभिजीत दीपके यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि संयम बाळगण्याचा सल्ला दिला.

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची होती मागणी

या आंदोलनाच्या माध्यमातून ‘नीट’ परीक्षेतील गोंधळावर बोट ठेवत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई व्हावी, यासाठी हे तरुण एकवटले होते. मात्र, ऐन आंदोलनातच हा हल्ला झाल्याने आंदोलन दडपण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; आधीच मिळाली होती जीवे मारण्याची धमकी

काही महिन्यांपूर्वीच अभिजीत दीपके यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची थेट धमकी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेसाठी घराबाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात केला होता. धमकीची पर्वा न करता दीपके देशभरात सातत्याने आंदोलने करत आहेत; मात्र आता थेट जयपूरमधील आंदोलनात त्यांच्यावर शारीरिक हल्ला झाल्यामुळे दीपके यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत ऐरणीवर आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात निवृत्तीवेतनधारकांसाठी जिल्हा पेन्शन/पी.एफ. कार्यशाळेचे आयोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धक्कादायक ! जयपूरमध्ये कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दीपकेंना मारहाण; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

धक्कादायक ! जयपूरमध्ये कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दीपकेंना मारहाण; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

June 15, 2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगावात निवृत्तीवेतनधारकांसाठी जिल्हा पेन्शन/पी.एफ. कार्यशाळेचे आयोजन

June 15, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

अखेर तारीख ठरली! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

June 15, 2026
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा भूकंपाची शक्यता! ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? हालचाली वाढल्या!

June 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page