पंजाबमधील अमृतसर येथे ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. कार्यक्रमादरम्यान केलेल्या त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेससह विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
अमृतसरमधील चौक मेहता येथे दमदमी टकसालच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात शीख संत, धार्मिक नेते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर जर्नेलसिंह भिंद्रनवाले, जनरल सुभेगसिंह आणि शीख स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष अमरिकसिंह यांची छायाचित्रे तसेच ऑपरेशन ब्लू स्टारदरम्यान नुकसान झालेल्या अकाल तख्ताचे छायाचित्र लावण्यात आले होते.
यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार हा इतिहासातील काळा दिवस होता’ असे म्हटले. तसेच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्णमंदिर परिसरात सैन्य पाठवून शीख समाजावर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला. या कारवाईत अनेक निष्पाप लोकांचा बळी गेल्याचे सांगत त्यांनी या घटनेची तुलना अहमदशाह अब्दालीच्या आक्रमणाशी केली.
महाजन पुढे म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात झालेल्या शीखविरोधी दंगलीत हजारो लोकांचा मृत्यू झाला, मात्र दोषींवर प्रभावी कारवाई झाली नाही. त्या घटनांची राजकीय किंमत काँग्रेसला आजही मोजावी लागत असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, ज्या कार्यक्रमात भिंद्रनवालेचा उल्लेख ‘शहीद’ म्हणून करण्यात आला, अशा कार्यक्रमात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन उपस्थित राहिल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसने या उपस्थितीवर आणि त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. महाजन यांच्या वक्तव्यामुळे आता राज्यासह राष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून या प्रकरणावर पुढील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आ















Discussion about this post