Monday, June 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावातील नुकसानग्रस्त केळी उत्पादकांच्या मदतीसाठी शरद पवार सरसावले; प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश.

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 8, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावातील नुकसानग्रस्त केळी उत्पादकांच्या मदतीसाठी शरद पवार सरसावले; प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश.
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावसह उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि भीषण वादळी वाऱ्यांमुळे केळीसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाताशी आलेली पिके डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्याने बळीराजा गंभीर संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची आग्रही मागणी केली आहे. शरद पवार यांनी या प्रश्नात थेट लक्ष घातल्यामुळे हतबल झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज सोमवारी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न, अवकाळी पाऊस आणि पिकांच्या नुकसानीसह विविध कृषी विषयांवर पक्षाची सविस्तर भूमिका मांडली. त्यात उत्तर महाराष्ट्रातील केळीसह उसाच्या नुकसानीकडे त्यांनी विशेषकरुन लक्ष वेधले. नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतून पिकांच्या नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल प्राप्त झाले आहेत.

या अहवालांमध्ये विशेषतः केळी आणि ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आणि नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांचे स्वतंत्र पथक संबंधित भागात पाठविण्यात आले होते. या पथकाने नुकसानीची पाहणी करून आपला अहवालही सादर केला आहे. या अहवालाच्या आधारे पुढील भूमिका आणि सरकारकडे करण्यात येणाऱ्या मागण्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जळगाव जिल्ह्यासही वादळी वाऱ्यांचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी काढणीवर आलेल्या केळीच्या हजारो हेक्टरवरील केळी बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या आहेत. केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चातून उभ्या केलेल्या बागा काही तासांच्या वादळात उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक स्तरावरून समोर येत आहे. ऊस पिकालाही मोठा फटका बसल्याने उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याअनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचे सांगत शरद पवार यांनी प्रशासनाने विलंब न करता पंचनामे पूर्ण करावेत, अशी मागणी केली.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी सरकारच्या धोरणावर बोट ठेवले. “राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. शेतीवरील संकट अधिक गंभीर होऊ नये यासाठी सरकारने सकारात्मक उपाययोजनांवर तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे हीच सर्वात मोठी गरज आहे,” असे आवाहन त्यांनी सरकारला केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची वज्रमूठ! २५ पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती, ‘या’ ५ मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा मेगाप्लाॅन

Next Post

जळगाव एमआयडीसीतील कुलर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान, मोठा अनर्थ टळला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव एमआयडीसीतील कुलर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान, मोठा अनर्थ टळला

जळगाव एमआयडीसीतील कुलर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान, मोठा अनर्थ टळला

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव एमआयडीसीतील कुलर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान, मोठा अनर्थ टळला

जळगाव एमआयडीसीतील कुलर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान, मोठा अनर्थ टळला

June 8, 2026
जळगावातील नुकसानग्रस्त केळी उत्पादकांच्या मदतीसाठी शरद पवार सरसावले; प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश.

जळगावातील नुकसानग्रस्त केळी उत्पादकांच्या मदतीसाठी शरद पवार सरसावले; प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश.

June 8, 2026
दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची वज्रमूठ! २५ पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती, ‘या’ ५ मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा मेगाप्लाॅन

दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची वज्रमूठ! २५ पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती, ‘या’ ५ मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा मेगाप्लाॅन

June 8, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगावात सोने १५०० तर चांदी ४ हजार रुपयांनी स्वस्त; ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

June 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page