नवीन दिल्ली । केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या २६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे त्यानुसार 10 राज्यामधील 26 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. राज्यसभेतील विद्यमान खासदारांचा कार्यकाळ 21 जून ते 19 जुलै 2026 दरम्यान संपत असल्याने या जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे.

त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंह बिट्टू यांचा समावेश आहे. त्याशिवाय २ जागांवर पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुनेत्रा पवार यांच्या जागेचाही समावेश असून राजकीय वर्तुळाचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे.

कसे आहे निवडणुकीचे वेळापत्रक?
निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, 1 जून रोजी अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर 9 जून रोजी अर्ज छाननी केली जाईल, तर 11 जून रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. त्यानंतर 12 राज्यांतील 2 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होईल.















Discussion about this post