Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गुंतवणुकीच्या नावाखाली जळगावात कोट्यवधींचा महाघोटाळा; शेकडो गुंतवणूकदारांना गंडवणारा मुख्य एजंट अखेर गजाआड!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 15, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव । गुंतवणुकीवर दरमहा अवाढव्य परताव्याचे आमिष दाखवून तब्बल २७९ गुंतवणूकदारांची २३ कोटी ८१ लाख ७२ हजार ५३० रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रा. लि. पुणे’ कंपनीच्या जळगावमधील मोठ्या घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखेने भांडाफोड केला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कंपनीचा जळगाव शाखेचा मुख्य फ्रँचायझी प्रमुख आणि एजंट मिलिंद शालिकराव पाटील (वय ४१, रा. शिव कॉलनी, जळगाव) याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. संशयित आरोपी मिलिंद पाटील याने पोलिसांचा आपल्यावर संशय येऊ नये म्हणून सुरुवातीला स्वतःच कंपनीच्या संचालकांविरुद्ध एक तक्रार अर्ज दिला होता. मात्र, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा खात्याने कसून तपास केला, तेव्हा मिलिंद पाटील हाच जळगाव फ्रँचायझीचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. तो थेट गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारत होता, त्यांना बनावट करारनामे करून देत होता आणि या बदल्यात त्याला कंपनीकडून लाखो रुपयांचे कमिशन मिळत होते.

पाच वर्षांत विणले फसवणुकीचे जाळे
डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या पाच वर्षांच्या काळात जळगाव शहर आणि परिसरात मोठमोठे सेमिनार, आलिशान बैठका घेऊन नागरिकांना जाळ्यात ओढण्यात आले. शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली सेबी (SEBI) च्या सर्व नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर ठेव योजना चालवण्यात आली. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी वाढीव नफ्याचे खोटे सादरीकरण केले जात होते. या भुलथापांना बळी पडून सेवानिवृत्त कर्मचारी, सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांनी कर्ज काढून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली.

पोलिसांनी तपासादरम्यान अनेक आर्थिक व्यवहार, बँक खात्यांतील हालचाली, करारपत्रे आणि गुंतवणूकदारांचे निवेदन तपासले. त्यातून मिलिंद पाटीलचा सक्रिय सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू केली असून या घोटाळ्यात आणखी काही एजंट आणि सहकारी सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा! सोने ३ हजारांनी तर चांदी १७ हजारांनी घसरली, नवीन दर काय?

Next Post

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुंबईत पावसाचा कहर! राज्यात इतका पाऊस का वाढला? पुण्याच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले कारण..

राज्यात पावसाचा धुमाकूळ कायम; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जळगावातही मुसळधार पावसाची शक्यता

July 8, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

रस्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी ७ हजारांची लाच; चाळीसगावातील उपविभागीय अभियंता आणि सहायक ACBच्या जाळ्यात

July 8, 2026
अमळनेर हादरले! सेल्फीच्या नादात ३ मुलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू

अमळनेर हादरले! सेल्फीच्या नादात ३ मुलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू

July 7, 2026
जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

July 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page