तुम्हीही दहावी उत्तीर्ण असाल आणि राज्य शासनाच्या सरकारी नोकरीसाठी प्रयन्त करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘चौकीदार’ पदाच्या एकूण ४१६ जागा भरल्या जाणार आहे. इच्छुक उमेदवार tribal.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो. १८ मे २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
भरतीसाठी पात्रता काय?
या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी/SSC) उत्तीर्ण असावा तसेच त्याचे वय १ एप्रिल २०२६ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षांपर्यंत असावे.
इतके शुल्क लागेल?
या भरतीसाठी अर्ज करताना तुम्हाला अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अमागास: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना १५००० ते ४७६०० रुपयापर्यंतचा पगार मिळेल. फक्त दहावी पास उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागात नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी निर्माण झाली आहे.















Discussion about this post