मुंबई: भाजपचे आक्रमक मंत्री नितेश राणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. एका जुन्या प्रकरणात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना दोषी ठरवत एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कणकवली शहरातील रस्त्यांची परिस्थिती चिखलमय झाली होती. त्यावेळी अभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारत शेडेकर यांच्यावर चिखल फेक आणि मारहाण करण्यात आल्याची शेडेकर यांनी तक्रार केली होती. त्या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर 353, 332, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. यातील 504 कलमा अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग प्रकरणी नितेश राणे यांना एक महिन्याचा कारावास आणि एक लाख रूपये दंड सुनावण्यात आला आहे.
तर इतर सर्व गुन्ह्यांमधून नितेश राणेंसह सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपींच्या वतीने त्या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरिता अर्ज दिला आहे. त्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. लवकरच आम्ही उच्च न्यायालयामध्ये रिव्हिजन दाखल करणार अशी माहीती नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे.














Discussion about this post