Wednesday, June 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्र होरपळला : आज या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, जळगावातही मोसमातील सर्वोच्च तापमान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 27, 2026
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
महाराष्ट्रावर दुहेरी संकट! थेट हाय अलर्ट जारी, प्रशासनाचा नागरिकांना मोठा इशारा
बातमी शेअर करा..!

मुंबई/जळगाव । राज्यात पूर्व मोसमी पावसाने पाठ फिरवताच सूर्याने आपले रौद्र रूप धारण केले आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा सातत्याने वाढत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अकोला येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर शेजारील अमरावतीतही पारा ४६.८ अंशांवर पोहोचला आहे. तसेच जळगावातही रविवारी तापमानाने यंदाच्या मोसमातील उच्चांक गाठला आहे.

विदर्भात ‘ऑरेंज’ आणि ‘येलो’ अलर्ट
हवामान विभागाने उष्णतेची तीव्रता लक्षात घेता अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी आज (ता. २७) ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या भागात पुढील काही तास तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच बुलडाणा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ देण्यात आला असून, येथील उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे.

खान्देशातही स्थिती बिकट आहे. जळगाव जिल्ह्याचे तापमान रविवारी (दि. २६) ४४°C वर पोहोचले. विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा आलेख चढताच आहे. २४ एप्रिलला ४२ अंश, २५ एप्रिलला ४३ अंश आणि २६ तारखेला ४४ अंश अशी सलग वाढ नोंदवली गेली आहे. केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीचे तापमानही २८ अंशांपर्यंत गेल्याने रात्रीचा गारवा गायब झाला आहे. घरांमध्ये कूलर असूनही गरम वाफा येत असल्याने नागरिकांना मोठा उकाडा सहन करावा लागत आहे.

वातावरणात का झाला बदल?
हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर कर्नाटकपासून कोमोरीन भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी आकाश ढगाळ असले तरी, उन्हाचा चटका आणि आर्द्रतेमुळे उकाडा कमी होण्याऐवजी वाढतच आहे. ढगाळ वातावरणामुळे सूर्याची किरणे जमिनीवर अडकून राहत असल्याने ‘ग्रीन हाऊस इफेक्ट’सारखी स्थिती निर्माण होऊन उष्णता वाढत आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा (Heat Stroke) धोका वाढला आहे. प्रशासनाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत काम नसल्यास बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच भरपूर पाणी पिणे, सुती कपडे वापरणे आणि आहारात थंड पदार्थांचा समावेश करणे असे आरोग्य सल्ले देण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भयंकर ! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात २५ दिवसांत १८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

Next Post

जळगाव पोलीस मुख्यालयात भीषण आग; पोलिसांचे महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्रे जळून खाक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव पोलीस मुख्यालयात भीषण आग; पोलिसांचे महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्रे जळून खाक

जळगाव पोलीस मुख्यालयात भीषण आग; पोलिसांचे महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्रे जळून खाक

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोटार काढताना विहिरीत कोसळल्याने आजोबा-नातवासह तिघे जखमी; जळगावातील घटना

मोटार काढताना विहिरीत कोसळल्याने आजोबा-नातवासह तिघे जखमी; जळगावातील घटना

June 24, 2026
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

‘फी परतावा’च्या आमिषाला बळी; अमळनेरच्या महिलेला २२.७५ लाखांचा सायबर गंडा

June 24, 2026
खासगी मेडिकल कॉलेजांच्या फीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

खासगी मेडिकल कॉलेजांच्या फीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

June 24, 2026
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

गृह विभागाकडून राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल; जळगावला मिळाले तीन नवीन डीवायएसपी

June 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page