भुसावळ । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भुसावळ विभागात रेल्वे पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी पारस–गायगाव–अकोला या मार्गावर ऑटोमॅटिक ब्लॉक सिस्टीमशी संबंधित नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी २३ एप्रिलला भुसावळ वर्धा, भुसावळ-बडनेरा मेमूच्या अप-डाऊन फेल्या रद्द, तर तीन लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे.
गाडी क्रमांक १११२१ भुसावळ वर्धा मेमू, १११२२ वर्धा भुसावळ मेमू, ६११०१ भुसावळ बडनेरा, ६११०२ बडनेरा – भुसावळ मेमू या चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकमुळे २०८२० ओखा पुरी एक्प्रेस ही गाडी शेगाव ते श्री क्षेत्र नागझिरी दरम्यान २ तास २५ मिनिटे, ११०४० गोंदिया -कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी काटेपूर्णा ते शेगाव दरम्यान २ तास २० मिनिटे, १२४८५ नांदेड श्री गंगानगर एक्सप्रेस काटेपूर्णा ते शेगाव दरम्यान २ तास थांबवून ठेवली -जाईल. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागेल.
पायाभूत सुविधांची देखभाल आणि रेल्वे सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी हा ब्लॉक अत्यंत आवश्यक आहे. यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन भुसावळ रेल्वे विभागाने केले आहे.















Discussion about this post