नाशिक । सध्या राज्यात गाजत असलेल्या नाशिकच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीतील कथित लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानविरोधात कंपनीने मोठी कारवाई केली. कंपनीने निदा खानला सस्पेंड केले आहे. या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी होणार असून घडामोडींना वेग आला आहे.
कंपनीने 9 एप्रिल 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, गंभीर आरोप आणि सध्या कस्टडीत असल्यामुळे कर्तव्य पार पाडणे शक्य नसल्याचे नमूद करत निदा खानला सस्पेंड करण्यात आले आहे. निदा खान 27 डिसेंबर 2021 रोजी TCS मध्ये प्रोसेस असोसिएट म्हणून रुजू झाली होती.
या निलंबन आदेशात कठोर अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार तिचे सर्व नेटवर्क अॅक्सेस तात्काळ बंद करण्यात आले असून कंपनीचे साहित्य परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ऑफिस किंवा वर्क फ्रॉम होमवर काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत इतर कर्मचाऱ्यांशी संपर्क न ठेवणे आणि पूर्ण गोपनीयता राखणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हे आदेश शेखर कांबळे यांनी जारी केले असून, नियमांचे उल्लंघन केल्यास पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.














Discussion about this post