अकोला । शासकीय कामात पारदर्शकता अपेक्षित असताना, चक्क एका वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याने खाणी सुरू ठेवण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अकोला जिल्ह्यात दगड, गिट्टी, क्रशर आणि मुरूम अशा गौण खनिजाच्या जवळपास ७० खाणी आहेत. खाण मालकांनी केलेल्या आरोपानुसार, या खाणी सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आणि त्या बंद न करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकवाड यांनी प्रत्येक खाण मालकाकडे १५ हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास ‘तुमचे व्यवसाय बंद पाडू’ अशी धमकीही त्यांनी दिली होती.
खाण मालकांनी गायकवाड यांच्यासोबत झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप्स पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर केल्या आहेत. तक्रार दिल्यानंतर तब्बल ९ दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात BNS (भारतीय न्याय संहिता) कलम ३०८(२), ३५१(१) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या (PCA) कलम ७ नुसार गुन्हा (अप.नं. २७०/२०२६) नोंदवला आहे.















Discussion about this post