Saturday, May 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘पुष्पा’ स्टाईलने वन्य प्राण्यांची तस्करी उधळली; नंदुरबार पोलिसांची धडक कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 14, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
‘पुष्पा’ स्टाईलने वन्य प्राण्यांची तस्करी उधळली; नंदुरबार पोलिसांची धडक कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त
बातमी शेअर करा..!

नंदुरबार । भाजीच्या कॅरेटच्या आडून ‘पुष्पा’ चित्रपटाच्या स्टाईलने वन्य प्राण्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न नंदुरबार पोलिसांनी उधळून लावला आहे. महाराष्ट्रातून गुजरातकडे वन्य प्राण्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) नवापूर तालुक्यातील विसरवाडीजवळ सापळा रचून एका आयशर ट्रकमधून भारतीय कोल्हे, तीतर आणि जंगली पोपटांची होणारी अवैध वाहतूक रोखली. या कारवाईत पोलिसांनी २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पाच तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.

मालेगावहून गुजरातच्या दिशेने एका आयशर ट्रकमध्ये वन्य प्राणी नेले जात असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे विसरवाडी पोलीस आणि वनविभागाच्या मदतीने सुरत-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर रात्री ८ वाजेच्या सुमारास कडक नाकेबंदी करण्यात आली. संशयित आयशर ट्रक येताच पोलिसांनी तो थांबवून झडती घेतली.

भाजीच्या कॅरेटचा आडोसा, आत मात्र पिंजरे!
तस्करांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ‘पुष्पा’ चित्रपटाप्रमाणे शक्कल लढवली होती. ट्रकमध्ये मागच्या बाजूला वरच्या थरात भाजीपाला भरलेले कॅरेट रचले होते, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. मात्र, पोलिसांनी बारकाईने तपासणी केली असता, या कॅरेटच्या आड लोखंडी पिंजऱ्यांमध्ये वन्य प्राणी क्रूरपणे कोंडलेले आढळले.

या कारवाईत पाच भारतीय कोल्हे, १९० तितर आणि ९५ जंगली पोपट जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कोल्ह्यासारख्या हिंस्त्र आणि दुर्मिळ प्राण्यांची तस्करी नेमकी कशासाठी आणि कोणाला केली जात होती, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू ; जळगावातील दुर्दैवी घटना

Next Post

महाराष्टात खळबळ ! लाच मागितल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

महाराष्टात खळबळ ! लाच मागितल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव विधान परिषदेसाठी मविआकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर; महायुतीमधील संभ्रम संपेना

जळगाव विधान परिषदेसाठी मविआकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर; महायुतीमधील संभ्रम संपेना

May 30, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

LPG च्या नियमात होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल; 1 जून पासून होणार लागू

May 30, 2026
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आखली रणनीती ; राज्यात विभागनिहाय बैठकांचे आयोजन

महाराष्ट्र ते दिल्ली, काँग्रेसमध्ये होणार मोठा फेरबदल; थेट ७ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार

May 30, 2026
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

जळगाव पोलिस दलात मोठे खांदेपालट; ४३ पीएसआयसह तब्बल ३९९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

May 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page