सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) विविध मंत्रालयांतर्गत रिक्त असलेल्या पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना संस्कृती मंत्रालय, संरक्षण मंत्रालय तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
ज्या इच्छूक उमेदवाराला या पदांवर काम करण्याची इच्छा आहे. त्यांनी UPSC च्या अधिकृत वेबासाइटला भेट द्यावी लागेल. तसेच या भरतीची प्रक्रिया तारिख ११ एप्रिल २०२६ पासून सुरु झाली आहे. तर याची शेवटची तारिख ही १ मे २०२६ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल. याची प्रोसेस ही ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. पण उमेदवारांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करणं फायद्याचं राहील. कारण शेवटच्या दिवसांमध्ये वेबसाउटवर जास्त लोड आल्या कारणामुळे तुम्हाला अर्ज करताना खूप अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.
कोणत्या पदांसाठी भरती आहे?
UPSC आयोगाची भरती ही एकूण १६ पदांसाठी असणार आहे. यामध्ये विविध विभाग असतील. असिस्टेंट कीपरसाठी १ पद, सीनिअर स्टोर ऑफिसर ग्रेड २ साठी ७ पदे तर लाइव्हस्टॉक ऑफिसरसाठी ८ पदांची भरती असणार आहे. उमेदवार त्यांच्या इच्छेनुसार आणि पात्रतेनुसार कोणत्याही पदासाठी अर्ज करु शकतो.
कसा कराल अर्ज?
१. सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
२. ‘Online Recruitment Application (ORA)’ या पर्यायावर क्लिक करा.
३. संबंधित पदाची जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपली नोंदणी करा.
४. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरून प्रक्रिया पूर्ण करा.
५. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा.















Discussion about this post