देशातील कर्जदारांसाठी महत्त्वाची असलेली पतधोरण बैठक पूर्ण झाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेटबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करता तो ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या ईएमआयमध्ये तात्पुरता तरी कोणताही बदल होणार नाही.
दोन दिवस चाललेल्या पतधोरण बैठकीनंतर ८ एप्रिल रोजी हा निर्णय जाहीर करण्यात आला. सध्या आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थिती आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता लक्षात घेऊन सावध भूमिका घेत रेपो रेट स्थिर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, रेपो रेट स्थिर राहिल्यामुळे बँकांच्या कर्जावरील व्याजदरातही बदल होणार नाही. परिणामी, सध्या कर्जदारांच्या ईएमआयमध्ये कोणतीही घट होणार नसली तरी वाढही होणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, पुढील काही महिन्यांत महागाई दर आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊनच रिझर्व्ह बँक पुढील निर्णय घेणार आहे. त्यामुळे आगामी पतधोरण बैठकीकडे कर्जदारांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post