आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आता भारतात महागाई डोकं वर काढू लागली आहे. एकीकडे या युद्धामुळे भारतात गॅस सिलिंडरसह अनेक वस्तुंच्या किमती वाढल्या असताना आता इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाले आहेत. बिहारमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे त्यामुळे सर्वासामान्यांना झटका बसला.
पेट्रोलियम कंपन्यांनी बिहारमध्ये पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईचा झटका दिला. गुरूवारी बिहारमध्ये पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू करण्यात आले. या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहक आणि वाहनचालकांवर झाला आहे. नवीन दरांनुसार, पेट्रोल प्रति लिटर ५ रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर ३ रुपयांनी वाढले आहे.
बिहारमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०५.३५ रुपयांवरून ११०.३५ रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर डिझेल प्रति लिटर ९१.५८ रुपयांवरून ९४.५८ रुपयांवर पोहचले आहे. वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे मालवाहूक आणि परिवहन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाचे भाडे देखील वाढण्याची शक्यता आहे.
वाढत्या इंधन दरांचा परिणाम केवळ वाहनांपुरता मर्यादित राहणार नाही. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार. परिणामी फळे, भाजीपाला, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येण्याची शक्यता आहे. दरवाढीचा सर्वाधिक परिणाम मध्यमवर्गीय आणि दैनंदिन वाहन वापरकर्त्यांवर होईल. खासगी वाहन चालक, तसेच ऑटो, बस आणि ट्रक चालाकांना वाढीव खर्चाचा सामना करावा लागेल. त्यामुळे भाडेवाढ होऊ शकते.















Discussion about this post