मुंबई । राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोडी घडली आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर नंदुरबार जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळाला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) पुन्हा हे पद परत आले आहे. राज्य शासनाने याबाबत अधिकृत परिपत्रक जारी करून ही नियुक्ती जाहीर केली आहे.
पूर्वी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून माणिकराव कोकाटे हे कार्यरत होते. मात्र, शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यामुळे डिसेंबर २०२५ पासून नंदुरबारचे पालकमंत्रिपद रिक्त राहिले होते. या कालावधीत जिल्ह्यातील विकास कामे आणि प्रशासकीय बाबींवर परिणाम होत होता. आता ही रिक्तता भरून काढण्यात आली असून, हसन मुश्रीफ यांना ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.















Discussion about this post