जळगाव । गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज सोनं आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,075 रुपये तर चांदीचे दर 2,53,380 रुपये इतक्या पातळीवर पोहोचले, जे मागील काही दिवसांच्या तुलनेत अनुक्रमे 4 हजार आणि 13 हजार रुपयांनी कमी झाले.
सामान्यतः सणाच्या दिवशी मौल्यवान धातूंचे दर वाढण्याची शक्यता असते, पण आज गुढीपाडव्याला उलट दर घसरल्यामुळे ग्राहकांची गर्दी बाजारात दिसून आली. यंदा सोन्याचे दर मागील वर्षाच्या तुलनेत 70 हजार रुपये तर चांदीचे दर दीड लाख रुपयांपेक्षा जास्त वाढले होते, त्यामुळे सणाच्या दिवशी दर घसरण ही ग्राहकांसाठी सुखद वार्ता ठरली.
सराफ व्यावसायिकांच्या मते, अमेरिका-इराण युद्ध आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती यांचा सोनं-चांदीच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या 18 दिवसांपासून दरांमध्ये मोठा चढ-उतार दिसून आला आहे, मात्र गुढीपाडव्याच्या दिवशी स्थिरतेची चिन्हे दिसल्याने खरेदीदारांसाठी हा लाभ ठरला आहे.















Discussion about this post