जळगाव । जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जामनेर तालुक्यातील वाकोद गावाजवळ झालेल्या अपघातानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. भरधाव खाजगी बसने बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने शेतकरी आणि बैल जखमी झाले असून, या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले.
अपघातानंतर ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनामुळे जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. विशेष म्हणजे, परीक्षेसाठी निघालेले अनेक विद्यार्थीही या कोंडीत अडकले, त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अपघाताचा पुढील तपास सुरू असून, या मार्गावरील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.















Discussion about this post