जळगाव । धरणगाव तालुक्यातील १८ वर्षीय विद्यार्थ्याने जळगाव शहरातील शासकीय वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १७ मार्च रोजी दुपारी उघडकीस आलीय. रोहित समाधान पवार (वय १८, रा.निंभोरा ता.धरणगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील रोहित पवार हा जळगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. आज मंगळवारी १७ मार्च रोजी सकाळी त्याचे वडील समाधान पवार आणि काका त्याला भेटण्यासाठी वसतिगृहात आले होते. त्यावेळी ‘पोटात दुखत असल्याने कॉलेजला गेलो नाही’ असे रोहितने वडिलांना सांगितले होते.
वडील गावी परतल्यानंतर काही तासांतच ही दुर्दैवी घटना घडली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास रोहितचा रूममेट सागर शिरोळ कॉलेजवरून परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासाअंती त्याला मृत घोषित केले.














Discussion about this post