जळगाव । पाचोरा शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या खिशातील रोकड लंपास करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश करण्यात पाचोरा पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शोध पथकाने तात्काळ कारवाई करत जामनेर तालुक्यातील तीन महिला आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण ३२ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
काय आहेत कारवाई?
२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी वहगाव खुर्द येथील श्रावण ताराचंद पाटील (वय ७०) हे पाचोरा बसस्थानकावर बसमध्ये चढ़त असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पैटच्या खिशातून १२ हजार ४०० रुपये लंपास केले होते. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी बसस्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन महिलांची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली. या वेळी संशयित आरोपी महिला निर्मला सुनील जोशी रा. गंगापुरी, ता. जामनेर हिच्याकडून १३ हजार ५००, रुपये दूसरी संशयित सोनाली गणेश विधाते रा. कुंभारी हिच्याकडून ६ हजार ६०० रुपये आणि तिसरी संशयित उषाबाई तेजराव ऐकणार रा. कुंभारी, ता. जामनेर) हिच्याकडून १२ हजार ३०० रुपये असा एकूण ३२ हजार ४०० रुपये रोख मुद्देमाल जप्त करण्यात आल.















Discussion about this post