जळगाव/मुंबई । जळगावसह महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर चढउतार पाहायला मिळत आहेत. कधी कडाक्याची थंडी, कधी ढगाळ वातावरण, तर कधी अचानक उकाडा अशी स्थिती निर्माण झाली आहे. डिसेंबरप्रमाणेच जानेवारीतही राज्यात थंडी कायम राहील. मात्र, जानेवारी संपत आला असतानाही राज्यात अपेक्षित थंडी जाणवत नसून हवामानात मोठा बदल झाला. राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
जळगाव जिल्ह्यातही २७ जानेवारी रोजी झालेल्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच हवामान विभागाने वर्तवलेल्या नवीन अंदाजानुसार, जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. दरम्यान १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्यास सुरुवात होईल. प्रामुख्याने २ ते ५ फेब्रुवारी या काळात दुपारी ४ वाजेनंतर अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावेल. काही ठिकाणी हा पाऊस तुरळक असेल, तर काही ठिकाणी अचानक ढगफुटीसारखा जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या काळात वाऱ्याचा वेग ४० किमी प्रतितास इतका राहू शकतो, ज्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.















Discussion about this post