मुंबई । राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, या निवडणुकांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. महायुतीत असूनही शिंदे गटाच्या शिवसेनेला फारसे यश मिळाले नाही. मुंबईतही ठाकरे गटाने शिंदे गटाला मात दिली. या सुमार कामगिरीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असून, लवकरच अकार्यक्षम मंत्र्यांना पदावरून हटवून पक्षबांधणीची जबाबदारी देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.
29 महापालिकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाची कामगिरी फारशी साजेशी झालेली नसून एकनाथ शिंदे यांना जेवढं यश अपेक्षित होतं ते न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. जिथे जिथे पदरी अपयश आलं तिथल्या स्थानिक नेतृत्वाची भाकरी फिरवण्याच्या तयारीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत असंही समजतं. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.
जिथे अपेक्षित यश मिळालं नाही , त्या सर्वांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. जे मंत्री अकार्यक्षम ठरले त्यांची विकेट जाण्याची चिन्हं असून एकनाथ शिंदे हे त्यांना डच्चू देणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे संकेत एकनाथ शिंदेंनी महापालिका निवडणूकीपूर्वीच मंत्र्यांना दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पालिका निवडणूक ही शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी लिटमस्ट टेस्ट होती असंही म्हटलं जातं. त्यामुळे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्यावर पक्ष बांधणीची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. तर त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी एकनाथ शिंदे हे देणार असल्याचे कळते.















Discussion about this post